Home बीड लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दादांना लिहीले पत्र

लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दादांना लिहीले पत्र

79
0

आशाताई बच्छाव

1000522217.jpg

लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दादांना लिहीले पत्र

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड :  रोजी लाडकी बहीण माझी योजना राबवल्याबद्दल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणाबाईंनी लीहीले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्रातील सर्व बहिणींचे दादा आदरणीय एकनाथ (दादा) यांना पत्र लिहून आपल्या दैनंदिन जिवनातील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
आदरणीय एकनाथ (दादा ) शिंदे मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य
पत्र लिहण्यास कारण की, तू सुरू केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको.
त्या ऐवजी तू … गॅस चे दर कमी कर, विजेचे दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक ची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर, रुग्णालयांच्या मधे कमी खर्चात सर्वांना एकसमान सुविधा निर्माण कर, पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी कर, शाळेची वारेमाप वाढलेली फी, काही शाळांची मग्रुरी, मनमानी बंद कर, सर्वांना स्वस्तात उत्तम शिक्षण मिळेल ह्याची व्यवस्था कर, उच्च शिक्षण स्वस्त कर, महाविद्यालयांची वाढलेली फी कमी कर, जेणे करून भाचे मंडळी कमी खर्चात डॉक्टर इंजिनीयर होऊ शकतील, ट्रेन लां होणाऱ्या गर्दी वर काही तरी कर, तुझ्या भाचे आणि भाच्यासाठी नोकरी रोजगार उपलब्ध कर, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग धंदे थांबव … जेण करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही, त्यांचे आरोग्य सुखरूप राहील, प्रवासात जीव टांगणीला लागून प्रवास होणार नाही आणि त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे.
तूझी लाडकी बहीण

Previous articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !
Next articleगौर से देखो इन ‘खाकीधारियोंको!’ – कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे काय?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here