Home पुणे लोहगाव विकास कामापासून वंचित

लोहगाव विकास कामापासून वंचित

52
0

आशाताई बच्छाव

1000522199.jpg

लोहगाव,(प्रतिनिधी धनराज खांदवे): लोहगाव विकास कामापासून वंचित असल्याने लोहगावचा आमदार असल्याशिवाय विकास होणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत लोहगाव मधून उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. समावेश गावातील शासन नियुक्ती सदस्य असणारे सुनील खांदवे- मास्तर यांना पाठबळ देण्याचा निर्णय झाला. संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात झालेल्या या बैठकीला सखाराम खेसे, बापू खेसे, शरद मोझे, सोमनाथ कंद, सोमनाथ खांदवे, नेहा शिंदे, सुरेश रणसिंग, अमित जंगम, संतोष खांदवे, किरण गायकवाड, धनंजय रणखांब फिरोज शेख , रवि लोखंडे यासह स्थानिक रहिवाशी, सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठयासंख्येने उपस्थित होते. सुनील खांदवे- मास्तर म्हणाले, वडगाव शेरी मतदार संघाला आतापर्यंत प्रत्येक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आजी- माजी आमदारांनी आपल्याच भागाचा विकास केला आहे. लोकसंख्येने मोठे असलेल्या लोहगावला एकदाही संधी मिळाली नाही. लोहगावचा पुणे महानगर पालिकेत सामावेश होऊनही विकास कामे झाली नाहीत. जर लोहगावचा विकास करायचा असेल तर लोहगाव मधील आमदार झाला पाहिजे असा सर्वांचा आग्रह असल्याने मी विधानसभा निवडणुक लढण्यास तयार झालो आहे. सर्वांचे शेवटपर्यंत पाठबळ मिळाल्यास मी निवडणूक लढण्यास तयार असून नागरिकांनी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवणार विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले सुनील खांदवे हे सद्या भरतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत. ते त्याच पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत. मात्र भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगसेवक अनिल टिंगरे हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये आता सुनील खांदवे यांची भर पडली आहे. मात्र वडगावशेरी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे प्रतिनिधि धनराज खांदवे पुणे

Previous articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात मदत केंद्राचा शुभारंभ
Next articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here