Home बुलढाणा वानखेड गावात घाणीचे साम्राज्य.ग्रामस्थांमध्ये संताप : ग्रामपंचायत मध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष

वानखेड गावात घाणीचे साम्राज्य.ग्रामस्थांमध्ये संताप : ग्रामपंचायत मध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष

52
0

आशाताई बच्छाव

1000522174.jpg

वानखेड गावात घाणीचे साम्राज्य.ग्रामस्थांमध्ये संताप : ग्रामपंचायत मध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाचे दुर्लक्ष
स्वप्निल देशमुख
वानखेड :-संग्रामपुर तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध विकास कामासंदर्भात आणि दैनंदिन साफसफाई संदर्भात संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वानखेड या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात केव्हा कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला उपस्थित राहतात किंवा नाही..? ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात की बाहेरगावाहून ये जा करतात..? ग्रामसेवक ग्रामस्थांना कार्यालयात कोणत्या वेळेला कार्यालयीन कामकाजासाठी भेट देतात..? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन गावातील सार्वजनिक ठिकाणच्या गटारी यांची साफसफाई वेळेवर आणि नियमित होत नसल्याने येथील तीर्थक्षेत्र जगदंबा देवी संस्थान वानखेड मंदिराजवळील मुख्य रस्ता गटार घाणीने कचऱ्याने तुडुंब भरल्याने दुर्गंधी येत असल्याने भाविकांसह ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here