Home अमरावती कायद्यामधील बदल हा पिडीतांना न्याय मीळण्यासाठी, पोलीस आयुक्तांनी दिली नव्या कायद्याची माहिती.

कायद्यामधील बदल हा पिडीतांना न्याय मीळण्यासाठी, पोलीस आयुक्तांनी दिली नव्या कायद्याची माहिती.

43
0

आशाताई बच्छाव

1000522172.jpg

कायद्यामधील बदल हा पिडीतांना न्याय मीळण्यासाठी, पोलीस आयुक्तांनी दिली नव्या कायद्याची माहिती.
दैनिक युवा मराठा 
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
देशात १ जुलैपासून नवीन कायदा लागू झाला आहे.या कायद्यानुसार, सहिते ऐवजी भारतीय न्याय सहीता लागू झाली आहे. बी एम एस मध्ये ३८५ कलमाचा समावेश आहे. तसेच भारतीय नागरी संरक्षण सहितेत बी ए एस एस मध्ये ५३१ कलम आणि भारतीय पुरावा कायदा बीएसए मध्ये १७० कलमे आहेत. मुख्य उद्देश फौजदारी न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे. न्याय न्याय, समनता आणि निपक्षाता या तीन तत्त्वावर आधारित या कायद्याची निर्मिती झाली आहे. नवीन कायद्याचा मुख्य उद्देश पीडितांना न्याय देणे आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीन केंद्र रेड्डी यांनी सोमवारी राजापेठ ठाण्यात आयोजित नव्या कायद्याची जनजागृती कार्यक्रम उपस्थितांना दिली. कायदे लागू होण्यापूर्वीच शहर पोलीस आयुक्तलयातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना नवीन कायद्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहेत. नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी एन सी आर बी तपशीलवर माहिती उपलब्ध आहे. महिला आणि अल्पवयानिशि संबंधित गुन्हे, देशाच्या सीमेवरील सुरक्षेता आणि लष्कराला नव्या कायद्यात प्राधान्य देण्यात आले आहे. सायबर क्राईम, टेक्नॉलॉजी आणि फॅरंनसिक अधिक लक्ष दिले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. यावेळी पोलीस आयुक्त गणेश शिंदे व सागर पाटील यांच्यासह न्यायवैधानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक भांडारकर, जिल्हा सरकारी वकील ऑड. परीक्षीत गणोरकर, शिवाजी बचाटे, राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांच्यासह अन्य अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य, विधि महाविद्यालयाचे प्राध्यापक व अन्य हजर होते. दलाकडून ही उद्यान जागृती सुरू: पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने नवीन कायद्याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.१जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी कायद्याविषयी माहिती दिली. कडूनही अभियंता भवन येथे नवीन कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांनी नवीन कायद्याविषयी माहिती देऊन उपस्थिततांना मार्गदर्शन केले. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, व भारतीय साक्षी अधिनियम या कायद्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच नागपुरी गेट पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली आहे. नवीन कायद्याविषयी माहिती देताना ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी,पोलीस स्टेशन अधिकारी, नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here