Home नाशिक नाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

नाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

107

आशाताई बच्छाव

1000522162.jpg

नाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी

नाशिक : दिवसाढवळ्या वेटरने एका हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, काही दिवसांपूर्वीच नंदगावमध्ये पत्नीने कुटुंबीयांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आता नाशिकरोड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात दिवसाढवळ्या वेटरने एका हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाला असून, हॉटेलमध्ये कामाला असलेल्या वेटरला काम सांगितल्याच्या रागातून या संशयित वेटरने व त्याच्या साथीदाराने हॉटेल चालकावर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय..?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाममागे जखमी हॉटेल चालक नितीन हासानंद सचदेव हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा या नावाने त्यांचे हॉटेल चालवत आहेत. त्यांच्या या हॉटेलमध्ये डॅनिअल उर्फ डॅनी थोरात हा हल्लेखोर वेटर काम करत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मालकाणे या वेटरला ग्राहकांकडे आणि कामाकडे नीट लक्ष देण्यास सांगितले. याचा राग आल्याने वेटरने मालकासोबत हुज्जत घालत शिवीगाळ केली आणि “थांब तुला बघून घेतो”, असा दमही त्यांना दिला. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात तब्बल सात जण हॉटेलमध्ये घुसले. यावेळी हॉटेलचे चालक नितीन सचदेव हे काउंटरवर बसलेले असताना त्यांना काही समजण्याच्या आतच या टोळक्याने कोयता, रॉड व इतर हत्याराने त्यांच्यावर वार केले. हॉटेल चालक आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले असता हे हल्लेखोरही त्यांच्या मागे पळाले. भरदिवसा हा थरार नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर सुरू होता. यानंतर नागरिकांनी त्यांना नाशिकरोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या हल्ल्यात हॉटेल चालक नितीन सचदेव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे आणि त्यांना १५ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी तातडीने फिरवले तपासाचे सूत्र

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने तपासाचे सूत्र फिरवत तीन संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस करत आहेत.

Previous articleनामपूरला दिवसा घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी
Next articleकायद्यामधील बदल हा पिडीतांना न्याय मीळण्यासाठी, पोलीस आयुक्तांनी दिली नव्या कायद्याची माहिती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.