आशाताई बच्छाव
महिला कर्मचारी चालवणार”ड्रोन”आरोपीच्या शोधासाठी होणार उपयोग.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला.”ड्रोन चा कॅमेरा”हे तंत्रज्ञान वापरण्याचा उद्देश, मोर्चे, शहरातील राजकीय सभा, निवडणुकीचे निकाल दरम्यान होणारा जमाव, तसेच शहरातील वाहतूक जाम या गतिशीलतेवर लक्ष ठेवणे आहे. पोलीस घटनास्थळी लगेच पोचू शकत नसली तरी ड्रोनच्या कॅमेरा त्यादरम्यान शॉट घेऊन जमावा बदल तात्काळ माहिती देऊन त्यावर योग्य सूचना देऊन लगेच उपाययोजना करता येईल, तसेच जिल्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरता सुद्धा या ड्रोन चा उपयोग पोलीस विभागाला होईल. यात्रेला ऑपरेट करण्याकरता दोन महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सध्या सुरू असल्याचे पोलीस आयुक्त यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. शहरातील गुन्ह्याचा तपास अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी पोलीस आयुक्तालय अमरावती शहर यांच्याकडून अत्याधुनिक साहित्याची खरेदी नुकतीच करण्यात आली असून सदरच्या साहित्याचे वापराबाबत प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षक व तज्ञ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. यामध्ये प्रथम गुन्हा घडलेल्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा करण्याकरता थ्रीडी नेटिंग मशीन चे प्रशिक्षण पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त तुला देखरेख ठेवण्याकरता आधुनिक ड्रोन कॅमेरा घेण्यात आला असून त्याबाबतचे प्रशिक्षण पोलीस आयुक्तालय हे मैदानावर कंपनीचे तज्ञाकडून देणे सुरू आहे.. ड्रोन कॅमेरा चे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा १००० फूट पर्यंत वर जाऊन ४ किलोमीटरचे परिघात फिरू शकतो. म्हणजेच एका ठिकाणी बसून ड्रोन कॅमेरा द्वारे शहरातील महत्त्वाचे मोर्चे, सभा धार्मिक मिरवणुका यांच्या लक्ष ठेवणे सोपे होईल. तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे उच्च गुणवत्तेचे फोटो व व्हिडिओ घेता येईल शहरातील मिरवणुका, मोर्चे यांचे दरम्यान गैरकृत्य करणाऱ्यांना तात्काळ ओळखून ताब्यात घेणे सोपे होईल. काहीच नाही तर सदर ड्रोन कॅमेरा मध्ये इन्फ्रा रेड कॅमेरा असून रात्री दरम्यान अंधारात लावलेल्या गुन्हेगारांना शोधणे सोपे होईल. जंगल गोष्टी दरम्यान आरोपी शोधासाठी याचा वापर करता येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन कॅमेराचे थेट प्रक्षेपण लॅपटॉप व मोबाईलवर सुद्धा दाखवता येईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर जवळ होणाऱ्या गर्दीवर ड्रोन कॅमेरे की नजर होती. दरम्यान शहरात कुठल्या ठिकाणी गर्दी होत आहे याची निरीक्षण करण्यात येत होते. शहरातील गुन्ह्याचा तपास तातडीने व आधुनिक तंत्रज्ञान वापर व्हावा याकरिता पोलीस आयुक्त शहर यांच्याकडे अत्याधुनिक साहित्य खरेदी नुकतीच करण्यात आली. शहरात होणारे मोर्चे, सभा ,धार्मिक, राजकीय मिरवणुका यांच्यावर लक्ष ठेवण्याकरता आधुनिक दोन उपयोग होईल तसेच ड्रोन कॅमेरा मध्ये इन्फ्रार रोड असून मदत होईल व आरोपीचा शोध घेण्याकरता याचा वापर होईल असे नवीन चंद्रा रेड्डी पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी सदर माहिती दिली.