आशाताई बच्छाव
बार्शी तालुक्याच्या विकासाची दुरदृष्टी ठेवणारे विकासरत्न आमदार राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नातून बार्शी न्यायालयीन इमारतीची ५८ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित ठेकेदारास परवानगी
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर जिल्हा.
सोलापूर
बार्शी तालुक्याच्या विकासाची दुरदृष्टी ठेवणारे विकासरत्न आमदार राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नातून सततच्या पाठपुरावामुळे बार्शी न्यायालयीन इमारतीची ५८ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर काम सुरू करण्यास संबंधित ठेकेदारास परवानगी मिळाली आहे.आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून सदर न्यायालयीन इमारतीमध्ये स्टील्ट,तळमजला ३ मजले,१५कोर्ट हॉल बांधकाम करणे,अपंगांसाठी रस्ता,पाणीपुरवठा व मल निस्सारण,अंतर्गत विद्युतीकरण,बाह्य विद्युतीकरण,संरक्षक भिंत आणि गेट,माती परीक्षण,सी सी ड्रेन, सुरक्षारक्षक कक्ष व फ्लॅग पोस्ट, जमिनीखालील पाण्याची टाकी,मुख्य पाणीसाठा पंप हाऊस व बोरवेल,एबी रूम,पंप जनरेटर,सर्व फर्निचर, विद्युतीकरण,गॅस पाईपलाईन,रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा,अंतर्गत रस्ते,लिफ्ट,वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही,नाला कव्हरिंग व अंतर्गत गटार बांधकाम व बगीचे आदी कामे होणार आहेत.
बार्शी तालुक्यासाठी न्यायालयीन इमारत बांधकाम करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वप्नाला आता गती मिळणार आहे असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले. बार्शी कोर्टातील वकिल बांधव,भगिनी व नागरीकांनी आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार मानले.