आशाताई बच्छाव
आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
बुलढाणा _ जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आरोग्य विभागा अंतर्गत 22 जून 2024 ला आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली . यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते,जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण ,अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी होगे , अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिपे यांच्या मार्गदर्शनात आडगाव राजा व वडाळी येथील गावात ठिकठिकाणी हिवताप व डेंग्यू आजार विषयक व प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी माहिती देऊन हिवताप व डेंग्यू आजाराबाबत जन जागृती करण्यात आली व कोरडा दिवस पाळा यासंबंधी आवाहन करण्यात आले व हस्तपत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री संदीप उगले व आरोग्य सेवक श्री गोरख चव्हाण उपस्थित होते.