Home जालना सेवानिवृत्ती निमित्त प्रा.गुलाब भोयर यांचा सत्कार समारंभ.

सेवानिवृत्ती निमित्त प्रा.गुलाब भोयर यांचा सत्कार समारंभ.

140
0

आशाताई बच्छाव

1000493635.jpg

सेवानिवृत्ती निमित्त प्रा.गुलाब भोयर यांचा सत्कार समारंभ.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 24/06/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,प्रा.गुलाब राजाभाऊ भोयर, उपप्राचार्य म.ज्यो. फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रवीवार रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे.त्यानिमीत्य म.ज्यो.फुले कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालयाच्या शाळा समिती व सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीने 30 जून 2024 रविवार रोजी दु.2 :30 वा. म.ज्यो.फुले विद्यालय कळमनुरी येथे त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब माजी मंत्री,तथा अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली व बहिर्जी शिक्षण संस्था, वसमत यांचे अध्यक्षतेखाली व बहिर्जी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार मा.ऍड.मुंजाजीरावजी जाधव साहेब,सचिव तथा माजी आमदार मा.पंडितरावजी देशमुख सर,बहिर्जी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मा. दत्तरावजी अडकीने साहेब,संस्थेचे कोषाध्यक्ष मा.उमाकांतरावजी शिंदे सहसचिव मा.नितीनजी महागावकर,संचालक मा.ऍड रामचंद्ररावजी बागल,मा.प्रा. अनिल नादरे,मा.राम झुंझुरडे, बहिर्जी शिक्षण संस्थेचे संचालक तथा म.ज्यो फुले विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष मा.ऍड. अशोकरावजी सावंत, कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा समितीचे अध्यक्ष मा.शरदरावजी सावंत,बहिर्जी प्राथमिक विद्यालय शाळा समिती अध्यक्ष मा.डॉ. वसंतरावजी पतंगे ,अशा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.विद्यालयाकडून आयोजित या सेवानिवृत्ती समारंभास व त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आपण उपस्थित राहाण्याचे आवाहन. म.ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here