Home बुलढाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर मतदारांनी मतदान यादीत...

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

32
0

आशाताई बच्छाव

1000493614.jpg

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलडाणा :-भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे आणि हरकती स्विकारून निकाली काढल्यानंतर अंतिम मतदारयादी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मंगळवार, दि. 25 जून ते बुधवार, दि. 24 जुलै 2024 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी,मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदारयादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराकडून योग्य छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच विभाग, भाग यांची नव्याने रचना, मतदानकेंद्राच्या सीमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे.
नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोदणीची संधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करू शकतात. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. सदर अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दि. २३ जानेवारी २०२४ आणि दि. 4 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर electoralsearch.eci.gov.in जाऊन यादीतील आपले नाव तपासावे. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करावी. आपल्या मतदारयादीतील तपशिलामध्ये दुरूस्ती असल्यास कार्यक्रमानुसार नमुद कालावधीत संपूर्ण कार्यवाही करावी.
तसेच नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. दि. 25 जून 2024 ते दि. 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत बीएलओ घरी येणार असून याआधी अनावधनाने मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास बीएलओ यांच्याकडे किंवा ऑनलाईन स्वरूपात नमुना 6 भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.

नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांच्या सोबत संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे

Previous articleजमीन राहिली तर समोरच्या पेरण्या होतील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार राहुल बोंद्रे.
Next articleसेवानिवृत्ती निमित्त प्रा.गुलाब भोयर यांचा सत्कार समारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here