Home बुलढाणा जमीन राहिली तर समोरच्या पेरण्या होतील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार...

जमीन राहिली तर समोरच्या पेरण्या होतील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार राहुल बोंद्रे.

44
0

आशाताई बच्छाव

1000493604.jpg

जमीन राहिली तर समोरच्या पेरण्या होतील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी आमदार राहुल बोंद्रे.
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली:-बुलढाणा जिल्ह्यातून भक्ती महामार्ग हा सिंदखेडराजा तालुका चिखली तालुका आणि खामगाव तालुक्यातून 109 किलोमीटरचा होऊ घातला आहे त्यामुळे शेतकऱ्याची काळी कसदार जमीन ही भक्ती महामार्गामध्ये जात आहे त्यामुळे शेतकरी हा देश धडीला लागणार आहे त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिनांक 23 जुन 2024 रोजी एक दौरा आयोजित केला होता त्यामध्ये त्यांनी कवठळ, गांगलगाव अंत्रीखेडेकर, अंबाशी, एकलारा ,पांढरदेव या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यामध्ये मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की जर शेती राहिली तर पेरणी होईल जर पेरणी करायची आसेल तर या भक्ती महामार्ग ला विरोध करा आपल्या शेतकऱ्याला शेती नसेल तर आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना देशदडीला लागल्याशिवाय पर्याय नाही हा मार्ग हा शेतकरी देशोधडीला लावणारा मार्ग आहे या महामार्गामुळे मुंबई पूणे येथील बाहेरील भक्तांना जाण्यासाठी शेगाव जाण्यासाठी बरेच मार्ग असताना सुद्धा शासनाने भक्ती महामार्गाचा घाट घातला आहे त्यामध्ये हजारो एकर शेती या भक्ती महामार्ग मध्ये जात आहे आणि त्याला शेतकऱ्याचा पूर्णतः विरोध आहे विरोध असून सुद्धा शेतकऱ्यांना नोटीस मिळाले आहेत आणि हा भक्ति महामार्ग होऊन शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही आणि या बदल्यात शेतकऱ्यांना रेडीरेखनाच्या दुप्पट पैसे भेटणार आहेत अंत्रीखेडेकर येथे लोकांना संबोधित करत असताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं जर आपल्याला शेती पेरणी करणे असेल तर या महामार्गाला विरोध करणे आवश्यक आहे तसेच अंत्रीखेडेकर येथील एका शेतकऱ्याने तर एवढे पाच हजार कोटी जर या रस्त्यासाठी सुरुवातीचे बजेट आहे तर यापेक्षा सिंदखेडराजा ते शेगाव येथे विमानतळ बांधा आणि ज्या भक्तांना आवश्यक आहे त्यांनी विमान मार्गे प्रवास करा व परंतु आमच्या काळी कसदार जमीन आम्ही या भक्ती महामार्गासाठी देणार नाही असे सुद्धा माहिती दिली आहे सदर दौऱ्यामध्ये गांगलगाव अंत्रीखेडेकर अंबाशी एकलारा पांढरदेव येथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे येत्या एक तारखेला सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण करून दोन तारखेला मुंबईकडे काही शेतकरी हे मंत्रालय येथे रवाना होणार आहे यामध्ये मेरा बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान कॉटन मार्केट चे सभापती डॉक्टर वानखेडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी विकास लहाने मेरा बुद्रुक येथील कुमठे गुरुजी तसेच प्रत्येक गावातील शेकडो कार्यकर्ते हजर होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here