Home विदर्भ गोरेगाव तालुक्यातील घोटी नम्रता वृद्धाश्रमाला दिली भेट

गोरेगाव तालुक्यातील घोटी नम्रता वृद्धाश्रमाला दिली भेट

56
0

आशाताई बच्छाव

1000493532.jpg

पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार डी .जी. रंगारी यांनी गोरेगाव तालुक्यातील घोटी नम्रता वृद्धाश्रमाला दिली भेट

गोंदिया _गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील नम्रता वृद्धाश्रमाला आज दिनांक 24 जून 2024 रोज सोमवारला दुपारी एक वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भेट दिली .त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या नम्रता वृद्धाश्रमाच्या बाबतीत समाधान व्यक्त केले .यावेळी वृद्धाश्रमात संस्थेचे सचिव सदानंद धारगावे ,कर्मचारी प्रियंका कांबळे , रंजीता साखरे ,रंजू रामटेके , सुनीता खोब्रागडे, प्रिया राऊत, गणिता भेलावे, सुनीता शास्त्री ,प्रीती कतलाम, यावेळी उपस्थित होते .त्याचप्रमाणे वृद्ध द्रुपता साखरे ,शांताबाई रामटेके , सुधाताई रामटेके यावेळी तिथे उपस्थित होत्या.

Previous articleपंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित
Next articleसाकोलीतील अवैध अतिक्रमणे तातडीने हटवा – जनतेचे निवेदन सादर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here