Home विदर्भ पंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित

पंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित

146

आशाताई बच्छाव

1000493526.jpg

पंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित

गोंदिया _प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील रहिवासी पत्रकार पंकज रहांगडाले हे मागील पाच वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आपल्या लेखणीच्या माध्यमातून सतत प्रयत्न करीत असतात .त्याचप्रमाणे न्यूज प्रभात उपजिल्हा प्रतिनिधी गोंदिया जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गोंदिया जिल्हा त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा पब्लिक न्यूज ला सुद्धा ते कार्यरत आहेत त्यांच्या या केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील अनेक चाहत्यांनी व भंडारा जिल्ह्यातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleविधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?
Next articleगोरेगाव तालुक्यातील घोटी नम्रता वृद्धाश्रमाला दिली भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.