Home जालना ६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन

६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन

45
0

आशाताई बच्छाव

1000493447.jpg

६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन

सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)

मी एकटा पडलोय, मराठा जात संकटात, जरांगेंची समाजाला भावनिक साद..

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलै पर्यंतचा नवा अल्टिमेटम दिला असून, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात सापडली आहे!” असे भावनिक आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तसेच यावेळी जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील सर्व ओबीसी नेते त्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले असून त्यामुळे मी एकटा पडलो आणि आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील आणि ते मोठे अधिकारी होतील अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे मला घेरलंय. मी एकटा पडलो असून, सत्ताधारी पक्षातील मराठे नेते आणि विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. त्यामुळे जर आपल्या लेकरांचं वाटोळ होऊ द्यायचं नसेल, तर सगळ्यांनी एकत्र राहिल पाहिजे आणि त्यासाठी 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

ओबीसी नेत्यांनी सिद्ध करून दाखवलं, मराठा नेत्यांनीही…

ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाच आहे. तर, मराठा समाजाच्या नेत्यांनीही फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा केवळ आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाच आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

त्यामुळेच आता मराठा जात संकटात सापडली असून माझे मराठा समाजाला आवाहन आहे की येत्या 6 ते 13 जुलै पर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. 6 तारखेपर्यंत समाज बांधवांनी आपली सर्व काम उरकून घ्यावीत आणि 6 जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता आपल्या शांतता जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे.

प्रत्येक जिल्ह्यात होणार शांतता जनजागृती रॅली

तसेच त्या दिवशी कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या शांतता जनजागृती रॅलीला ताकदीने आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय आणि आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलो असलो तरी पण मी मागे हटणार नाही. मी मेलो तरी काही हरकत नाही, पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous articleनाशिक मध्ये नवा ट्विस्ट शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?
Next articleविधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here