Home बुलढाणा मेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.

मेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.

52
0

आशाताई बच्छाव

1000492651.jpg

मेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली बुलढाणा :-मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे 325 वे वर्ष ,अखंड परंपरा, दरवर्षी हजारो वारकरी महिला पुरुष सहभागी असतात,मेरा बु व अंत्रीखेडेकर परिसरातील अनेक वारकरी सुद्धा या वारीत सहभागी होऊन पायी पंढरपूर ची वारी करतात, मुक्ताबाई आली म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या गावात आली,अशी लोकांची भावना आहे,दरवर्षी मुक्ताबाई पालखी परंपरेने मेरा बु। गावात मुक्कामी येत असते परंतु 3 वर्षे पासून उलटा प्रवास होत असल्याने मेरा चौकी भरोसा ला मुक्काम करते,परंतु मेरा बु।। मधील सर्व गावकरी माउलीला भेटायला मेरा चौकी ला जातात व लाडू,बेसनवडी चा प्रसाद वारीतील वारकरी यांच्या साठी घेऊन जातात,या वर्षी मुक्ताबाई पालखी मध्ये बाराशे स्त्री पुरुष असून त्यांचे दिनांक 24 6 2024 रोजी मेरा चौकी भरोसा येथील शिवशंकर विद्यालय मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे तर भोजनाची व्यवस्था भरोसा येथेल भक्तमंडळीने केली आहे मेरा बुद्रुक येथील मुक्ताबाईचे भक्त यांनी बेसनवडी घेऊन मेरा खुर्द भरोसा येथे जाणार आहे तसेच अंत्रीखेडेकर येथील भक्ती सुद्धा दर्शनासाठी मेरा खुर्द भरोसा येथे जाणार आहे सदर परंपरा हि सव्वा तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून चालू आहे त्यामुळे भक्तांना मुक्ताबाई पालखीचे आज दर्शन लाभणार आहे

Previous articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी,; अमरावती भेटीत घेतले आई अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन. अंबादेवी मंदिर जिर्णोव्दारसाठी सहकार्य करणार.
Next articleलातूर नीट पेपर फुटी प्रकरण,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here