Home नाशिक नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?

210
0

आशाताई बच्छाव

1000489618.jpg

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड..?

सतीश सावंत -कसमादे विभागीय प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा शांत होतो न होतो तोच आता नाशिकमध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी देखील जोर धरला असून तालुक्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीने चांगलीच रंगत आली आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे, अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार, व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत असून सर्व उमेदवार प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. त्यांचे समर्थकही शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत असून अंतिम टप्प्यात तिघाही उमेदवारांकडून मेळाव्याच्या माध्यमातून जेवनावळीवर भर दिला गेला.

ही आहे दराडे यांची जमेची बाजू..

दरम्यान, तिघाही उमेदवारांच्या मेळाव्यांना शिक्षक मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून यात विशेष म्हणजे मागील निवडणुकीत किशोर दराडे यांनी विजय मिळविला असल्याने पाच वर्षात मतदारसंघातील शिक्षकांशी संपर्क ठेवून प्रत्येक वर्षी दिवाळी भेटीच्या निमित्ताने भेटी घेतल्या तर देवळा तालुक्यातील बहुसंख्य शाळांनाही त्यांनी संगणक साहित्य उपलब्ध करून दिल्याने ती त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

गुळवे यांना मराठा विद्या प्रसारक संस्थेचा लाभ..?

तरी नाशिक जिल्ह्यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक असलेल्या कै.गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव संदीप गुळवे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे त्यांना सत्ताधारी मराठा विद्या प्रसारक संस्थेचा किती लाभ होतो हे पहावे लागणार आहे.

मविप्र कोणाच्या बाजूने उभी राहणार..?

तर तिसरे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे गेली अनेक वर्ष मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये सत्तेत असलेल्या श्रीमती नीलिमा पवार यांचे भाचे आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक जिल्ह्यात मविप्रच्या नीलिमा पवार समर्थक मतदारांचा लाभ होणार आहे. तरी या दोन्ही उमेदवारांपैकी नाशिक मधील अग्रेसर आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा लाभ कोणाला मिळणार हे देखील पाहणे औत्सुकत्याचे असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नीलिमा पवार आणि नितीन ठाकरे यांची ही ताकद पणाला लागली आहे. दरम्यान, आज जरी देवळा तालुक्यातील उमेदवार बरोबरीने असले तरी अर्थकारणाच्या पाकिटावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे अभिनंदन!..
Next articleभदंत विनय बोधी महाथेरो धम्म चळवळ पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here