आशाताई बच्छाव
काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखल फेकून केला निषेध.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. सध्या स्थिती केंद्र आणि राज्य शासनाच्या ध्येय धोरणा विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यमान शासनाच्या काळात जनतेला अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. याचा निषेध व्यक्त करत शुक्रवारी २१ जूनला शहर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य द्वारासमोर चिकलफेकआंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या प्रतीकात्मक पोस्टरवर भाजप काळातील विविध समस्या घेण्यात आल्या होत्या. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोस्टरवर चिखल फेक केली. त्रिव नारेबाजी करून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय अल्पसंख्यांक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काढून बसण्याचे काम शासनाने केले असल्याचे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. मागील १० वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातलेली आहे. सरकारी नोकर भरती, स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. परीक्षा झाल्या तर पेपर कोटीचे ग्रहण लागते. शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एम एस पी देत नाही. कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक मिरवणूक करीत आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील गैरविहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे सरकारने धोक्यात आणले आहे. महागाई ,बेरोजगारी पेपर कुठे महिला सुरक्षा, खते, बी बियाणाचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवनुक, तसेच चिखलात सुरू असलेल्या पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालविलेले चालढकल, हिट अँड रानच्या घटना, मुलीवर अत्याचार यासारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या विरोधात निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सरकारच्या प्रतीकात्मक प्रतिमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन केले. यावेळी माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माझी महापौर विलास भाऊ इंगोले, मिलिंद चिमटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप ऐडतकर, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेस अध्यक्ष जय श्री वानखडे, युवा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ गुहे, माझी महापौर अशोक डोंगरे, सचिन हिवसे, भैय्यासाहेब नइचळ, वंदना थोरात, डॉ सुजाता झाडे, आदीउपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची थ्री व निदर्शने काँग्रेस नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत भाजप सरकार विरोधात प्रचंड नालेबाजी करण्यात आली. नीट पेपर फुटीचा विषय असो, भाजप सरकारचा निषेध असो, केंद्रातील व महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, बेरोजगारी व महागाई वाढणाऱ्या माय युतीचा सरकारचा निषेध असो, चिखला सुरू असलेले पोलीस भरती प्रक्रियेचे निषेध असो, महिला सुरक्षा, खते बी बियाणे बाबतीत होत असलेल्या काड्या बाजाराचा निषेध असो अशा विविध घोषणांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गंजउन गेला होता