आशाताई बच्छाव
पुणे/हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: ठाण्यातील अर्जुन टॉवरला भीषण आग, मुंबईमध्ये ठाणे या ठिकाणी अर्जुन टॉवरला भीषण आग लागल्याने तेथील नागरिकांमध्ये अचानक गोंधळ निर्माण झाला. ही आग लागल्याचे पाहून तेथील नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या ताफ्यांना फोन करून बातमी कळवली. ही बातमी कळताच ठाण्यातील अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अग्निशमक दलाच्या गाड्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी धन्यवाद व्यक्त केले. नंतर सविस्तर माहिती मिळाल्यानंतर असे समजले की ठाण्यातील अर्जुन टॉवरला तिसऱ्या मजल्यावर ती आग लागली असल्याचे दिसून आले. त्या तिसऱ्या मजल्यावर ती ऍथॉलीक लॅब असल्याचेही दिसून आले. ही आग ऍथॉलीक लॅबलाच लागल्याचे दिसून आले. अग्निशमक दलाच्या गाड्यांनी ताबडतोब ही आग विझवण्यास सुरू केले असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे.