Home उतर महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन

248
0

आशाताई बच्छाव

1000485629.jpg

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी):- पामा ग्लोबल अबॅकस ॲण्ड मेंटल अर्थमॅटिक असोशियन आयोजीत..

१२ वी पामा इंडिया नॅशनल कॉम्पिटीशन पुणे येथील नॅशनल स्पोर्ट पार्क, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये आरुष ढोकचौळे, समरजीत जगधने, रौनक सिंग, गार्गी गाढे, विराज कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच आरुष ढोकचौळे हा त्याचे गटामधून चॅम्पियन ठरला. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून सन्मान चिन्ह मिळविले. तसेच विद्यार्थ्यांना व्हिएतनाम देशामध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी भाग घेण्याची संधी मिळाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना डि पॉल पब्लिक स्कूलचे फादर शिजो, सिस्टर दिप्ती व शिक्षक यांचे तसेच डि पॉल पब्लिक स्कूलच्या वतीने सदर स्पर्धेची तयारी करून घेणेकरीता संचालिका लुबना पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल डि पॉल पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांचे अभिनंदन केले.

Previous articleविधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या
Next articleकोपरगावचा शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here