आशाताई बच्छाव
प्रत्येक कार्यकर्त्याची जिद्द चिकाटी आणि मेहनतीमुळेच काँग्रेसचा विजय: आमदार यशोमती ठाकूर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मानले आभार.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जिद्द चिकाटी आणि मेहनत यामुळे काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर तसेच जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली येथील काँग्रेस भावना त आभार शुभेच्छा आयोजन करण्यात आले होते. या सभेत नवनिर्वाचित खासदार बळवंतराव वानखडे यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल २७ वर्षानंतर येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. बळवंतराव वानखडे यांची उमेदवारी घोषित झाली, त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. यात उत्साहाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने आणि मेहनतीने निवडणूक मध्ये काम केले असून त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे काय आज आपल्याला बळवंतराव वानखडे खासदार म्हणून पाहायला मिळत असल्याचे मत जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. तर हे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतले मेहनतीचा फळ आहे, असे म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थितीच्या मेहनतीचा गौरव केला. सभेला जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोळ, माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांचन मला गावंडे, सेवा दलचे प्रदीप देशमुख, डॉ. राजीव ठाकूर, बाळासाहेब हिंगणीकर, भैय्यासाहेब मेटकर, दयाराम काळे, रामेश्वर अभ्यंकर, प्रमोद दाळू, जयंतराव देशमुख, शिवाजी देशमुख, मुकुंदराव देशमुख, प्रकाशराव काळबांडे यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या विविध सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.