Home नाशिक संतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको

संतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको

644
0

आशाताई बच्छाव

1000465996.jpg

संतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको नामपूर वार्ताहर वामन शिंदे 
नामपूर मालेगाव रस्त्यावरील कॉलेज शेजारील पूल हा धोकेदायक पुल झाला असून या  पुला मुळे मंगळवार दिनाक ११ रोजी रात्री भूषण गांगुर्डे व दिनेश रौदल या तरुणाचा अपघातात  पीक अप गाडी व मोटासायकल असा सामोरा समोर अपघात झाला असून या घटनेच्या निषेधार्थ नामपूर परिसरातील नागरिकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले होते
या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार  काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत काकड गावचे सरपंच संजय पवार   विनोद पाटील बाळासाहेब भदाणे    आपल्या भाषनात  सदर पुलाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे बोगस ठेकेदार वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
मयत झालेल्या कुटू बियाना प्रतेकी दहा लाखाची भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली   रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात मोठ्याप्रमाणात गर्दी जमा  झाली होती   जो पर्यंत सार्वजनिक बाधकाम विभाग  लेखी  हमी घेत नाही तो पर्यंत आंदोनकर्त्यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली या मुळे या ठिकाणी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता  अखेर सहायक पोलिस निरीक्षक पुरू शुत्त्म शिरसाठ यांनी  ठेकेदार वरती गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जमावाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला  विविध मागण्याचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम  शिरसाठ यांना देण्यात आले या वेळी काकड गाव सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते
 हे काम अमित बधान व अभिजित भुसे या ठेकेदारांनी घेतले असून  राजकीय नेत्याचे पाठबळ त्यांना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बागलाण तालुक्यात असंख्य ठिकाणी अशीच  लोकप्रतिनिधींची आशीर्वादाने बोगस कामे चालू आहेत  जनतेने आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे 
            दीपक पगार  आंदोलक 

 

 

मयत भूषण गांगुर्डे  रा मोरा ने वय ३५  व दिनेश रौदल राहणार बिजोरसे  वय ३२  हे दोन्ही कुटु बातील कर्ते होते लहान लहान मुले असून पत्नी  आई वडील आहेत या दुर्देवी  घटनेमुळे  काकड गाव. मोरा ने बिजो रसे गावावर शोककळा पसरली असून अनेक घरामधे चुलीच पेटल्या नाहीत 

Previous articleशेतीमध्ये टॉवर उभारणी जागेच्या मोजमापास पॉवर ग्रिड कंपनीकडून विलंब
Next articleपत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे विविध मान्यवरांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here