आशाताई बच्छाव
बायकोला सासरी का पाठवत नाही म्हणत जावयाने केला सासरच्या मंडळीवर चाकू हल्ला जावयासह 4 जणांविरुद्ध अमडापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
चिखली:- माझ्या बायकोला सासरी का पाठवत नाही असे म्हणत जावयाने सासरच्या मंडळीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही घटना 10 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, शेख मतीन शेख मोबीन रा.करवंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सलमाबी यांचा विवाह चिखली येथील शेख अनिस शेख वाहाब यांच्यासोबत झाला आहे सलमाबी ही मागील दीड महिन्यापासून प्रसुतीसाठी करवंड येथे आलेली होती. 10 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास जवाई शेख अनिस शेख वाहाब हा व त्याचा भाऊ शेख नवाब शेख वाहाब व त्यांच्यासोबत आलेले तीन मित्र हे करवंड येथे आले. सासरे शेख मोबीन यांना एकेरी शब्दात म्हणाला की तू कोण मालिक आहे माझ्या बायकोला का पाठवत नाही असे म्हणून सासरे यांना लुटून दिले तेव्हा सासरे यांनी मुलीला घेऊन जा असे म्हटले मात्र जावई व त्यांच्यासोबतच्या लोकांनी घरातील आई-वडील बहिण व भाऊ यांना लोट पाठ करून तुम्हाला ठार मारून टाकतो असे म्हणत मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर पोटावर व हातावर खिशातील चाकू काढून मारला त्याच वेळी मुलीचा भाऊ शेख मोबीन हा वाचवण्यासाठी गेला असता त्याच्या पोटात सुद्धा जावई यांनी चाकू मारून त्याला जखमी केले तसेच त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी सुद्धा लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्याचवेळी गावातील शेख जुनेद शेख रशीद, शेख लाला शेख रफिक व घराशेजारील गोपाल आवटे यांनी भांडण सोडविले मात्र त्यावेळी जावई व त्यांच्यासोबत आलेले सर्वजण त्यांनी आणलेल्या इको चार चाकी गाडीने फरार झाले.सदर घटनेची तक्रार अमडापूर पोलीस स्टेशनला दिली. अमडापूर पोलिसांनी जावई व त्याच्यासोबत आलेल्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे