Home सामाजिक माझं जीवन घडविणारी “अक्का” वात्सलमुर्ती!

माझं जीवन घडविणारी “अक्का” वात्सलमुर्ती!

63
0

आशाताई बच्छाव

1000365239.jpg

माझं जीवन घडविणारी “अक्का” वात्सलमुर्ती!
………………………………..‌……..                                      ठेच लागता पायी, उचलून कडेवरी घेई,झोप न येता मजला, कुशीत घेऊन गात होती अंगाई..! आज मातृदिन त्यानिमित हा विशेष लेख…
माझी आई म्हणजेच “अक्का” लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील एक साधी सरळ व्यक्ती.अगदी निरक्षर पण व्यवहारात अत्यंत कुशल व हुशार! माझे जीवन घडविताना माझ्या आईने अनमोल असा त्याग करून मला लहानाचे मोठे केले.माझे पालन पोषण करुन संगोपन केले.माझे वडील वारले तेव्हा मी अवघा दीड वर्षाचा होतो, तेव्हाच जर माझ्या आईने ठरवलेच असते तर दुसरे लग्न करून सुद्धा सुखा समाधानात राहु शकली असती.पण…नाही माझ्या भविष्यासाठी माझ्या आईने आपल्या ऐन तारुण्याची होळी पेटवून माझे जीवन घडविले.घरची गरीबी जरुर होती,मात्र स्वाभिमानाने जगणे सर्वप्रथम आईने शिकविले.लोकांच्या शेतमळयात मोलमजुरीचे कामे करुन आईने माझे शिक्षण देखील पुर्ण केले.घरात अठरा विश्व द्रारिद्रय असतांना कधी गिरणीच्या कुंडीतील पीठ आणून त्याच्याही भाकरी करून आईने खाऊ घातल्या.या सगळ्या खडतर वाटचालीच्या संघर्षमय जीवनात एकमेव व्यक्ती दादाजी रतन शेवाळे या अवलियाने भरभरून साथ दिली.आज माझी आई या जगात नाही, आईला आमच्यातून जाऊन पंधरा वर्षांचा काळ लोटला गेला.पण तरीही माझ्या आई “अक्का”ची उणीव भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न दुसरी “अक्का” श्रीमती आशाताई बच्छाव यांनी केला आहे.सुख असो अथवा दुःख प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा आदर्श आशाताई बच्छाव यांनी आपल्या वडिलांकडून म्हणजेच दादाजी रतन शेवाळे यांचेकडून आत्मसात केला आहे.तरी देखील आज आई सोबत नसल्याची कमतरता पावलोपावली जाणवते.अन ओठातून नकळतपणे शब्द बाहेर पडतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी! आजच्या मातृदिना निमित्त आईच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…!
राजेंद्र पाटील राऊत
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र

Previous articleमालेगाव शहर व परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी
Next articleमाझी आई “कौशल्या” आज मातृदिनाच्या निमित्ताने थोडसं आयुष्य आईसाठी काढूया
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here