आशाताई बच्छाव
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पत्रकार स्वप्निल देशमुख.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
याविषयी सविस्तर माहिती अशी की, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.हि निवड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी केली आहे.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी श्री स्वप्निल देशमुख यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय अध्यक्षाद्वारे निवड समितीकडे करण्यात आली होती त्यानुसार निवड समितीने देशमुख यांची निवड केली आहे.श्री स्वप्निल देशमुख हे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांचे विश्वासू आहेत विशेष म्हणजे ते युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.स्वप्निल देशमुख यांनी प्रशासनातील अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत.आणि आजही त्यांची भ्रष्टाचाराच्या विरोधात धडक मोहीम अव्याहतपणे सुरू आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असतांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड करण्यात आली . त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांनी श्री स्वप्निल देशमुख यांची निवड केली आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे श्री स्वप्निल देशमुख यांच्यावर सर्वच क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संघटनेमार्फत जनतेची, गोरगरिबांची कामे करुन तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात,व भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याची शाश्वती त्यांनी यावेळी दिली.त्यांच्या या नियुक्तीमुळे श्री पंडितराव तिडके प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, तसेच श्री वसंतरावजी देशमुख प्रदेशकार्याध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने, सचिव श्री मुरलीधर डहाके, उपाध्यक्ष श्री गणेशराव तौर, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री शिवकुमार काळे, हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री बालाजी वानखेडे, भोकरदन तालुका अध्यक्ष श्री बालासाहेब देशमुख,जाफराब तालुका अध्यक्ष श्री रामदास कदम यांसह अनेक पदाधिकारी यांनी स्वप्निल देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.