आशाताई बच्छाव
पालकाच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य,पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील पंथ्रोट येथे स्थानिक आर्य समाज मंदिरामध्ये विवाह नोंदणी संस्था असल्यामुळे अनेक तरुणाचे लग्नच नव्हे, प्रेम विवाह येथून होत असतात. यापुढे येथे आई-वडिलांच्या उपस्थित लग्न होतील, असा ठराव कार्यकारणी घेण्यात आला आहे.या निर्णयाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथे१६ जुलै १९३५ रोजी आर्य समाज मंदिराची स्थापना श्री ठाकरे गुरुजी यांच्या नेतृत्वात झाली होती. तत्कालीन सरकारने हिंदू मॅरेज ॲक्ट १९३५ मधील तरतुदीनुसार आर्य समाज मंदिराला विवाह विधी आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन १९३७ या सह लावण्याचे अधिकार दिले. त्यामुळे या प्रेमसंबंधातून वडिलांच्या नोंदणी संस्थेत लग्न, आई-विरोधात जाऊन लग्नकार्य मोठ्या होती. त्यामुळे संख्येने होत अनेक समस्यांना आर्य समाज मंदिर पदाधिकाऱ्यांना समोर जावे लागेल होते. मागील काही असे प्रकरणे तसेच याशिवाय वर्षापासून आर्य समाज मंदिर कार्यकारणी मध्ये अंतर्गत वाद होत आहे. काही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने मोठे वादळ उठले होते. त्यामुळे नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. दरम्यान, अरे समाज विवाह नोंदणी संस्थेला प्रेम विवाह झाल्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना, त्यातून निर्माण होणारे वाद कायदेशीर प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये होणारा वेळेचा अपव्यय काढण्यासाठी कार्य करणीने आता यापुढे प्रेमीयुगालाचा आई-वडिलांच्या संमतीनेच कुठलाही विवाह नोंदणी संस्थेत होणार असल्याचा ठराव घेतला. या ठरावानुसार, वर-वधू पक्षाच्या पालकांनी पाच दिवस अगोदर हजर राहून संमती घेणे आणि अनिवार्य केलेआहे. प्रेम विवाह किंवा पळून येऊन लग्न लावणाऱ्या तरुण तरुणीच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊन त्यांचे पडसाद संस्थेवरही उमटतात. म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आमचे प्रतिनिधी पीएन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी यांना रामेश्वर काकड, प्रधान ,आर्य समाज मंदिर पथ्रोट यांनी माहिती दिली आहे.