Home अमरावती सौभाग्य राखले किडनी देऊन पत्नीने पतीला जीवदान दिले. सुपर स्पेशलिस्ट मध्ये किडनी...

सौभाग्य राखले किडनी देऊन पत्नीने पतीला जीवदान दिले. सुपर स्पेशलिस्ट मध्ये किडनी शस्त्रक्रिया यशस्वी.

113

आशाताई बच्छाव

1000341750.jpg

सौभाग्य राखले किडनी देऊन पत्नीने पतीला जीवदान दिले. सुपर स्पेशलिस्ट मध्ये किडनी शस्त्रक्रिया यशस्वी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अमरावती येथे) शुक्रवारी ३९वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यामध्ये पत्नीच्या मायेमुळे तिच्या पतीचा जीव वाचला आहे. दोन्ही किडनी खराब झालेल्या आपल्या ५३ वर्षीय पतीला ४५ वर्षीय पत्नीने किडनी दान करीत नवे जीवदान दिले. आईच्या मायेचा अनुभव हा प्रत्येकाला अनेक वेळा आला असेल. मुलासाठी आई आपल्या जीवाची परवा न करता काहीही करायला तयार असते. अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे आतापर्यंत झालेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये किडनी दान करण्यामध्ये आईची संख्या अधिक आहे. परंतु, ३ मे रोजी मे रोजी पार पडलेल्या शास्त्रक्रियेमध्ये पत्नीने पतीला किडनी दान केली आहे. अकोला येथे रहिवासी असलेल्या प्रकाश मनोहर सालफळे (वय ५३) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मागील १४ महिन्यापासून त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. डायलिसिस करतेवेळी होत असलेल्या आपल्या पतीच्या त्रास लक्षात घेता, तसेच आपल्या कुटुंबाचा विचार करता पत्नीने वंदना प्रकाश सालफळे (वय ४५) हिने आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेत पतीला नवे जीवदान दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे. सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल के एम एस डॉ. अमोल नरोटे, ओ एस डी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्टड डा. अविनाश चौधरी, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ विशाल बाहेकर, डॉ.प्रतीक चीरडे बधीरीकरणतज्ञ्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. जाफर अली, किडनी ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

Previous articleमाजी नगरसेवक मल्लू शिंदे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
Next articleपालकाच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य,पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.