आशाताई बच्छाव
रेल्वे गाड्यांची औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर पुकारणी करा- अँड.मनोज संकाये
मित्र मंडळाच्या वतीने रेल्वे प्रबंधक यांना निवेदन सादर!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी
औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे महायुतीच्या सरकारने नुकतेच केले. या नावाची सर्वत्र अंमलबजावणी झाली मात्र परळी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची पुकारणी औरंगाबाद अशी होत होती. औरंगाबाद अशी पुकारणी न करता छत्रपती संभाजीनगर अशी पुकारणी करण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या मित्र मंडळाच्या वतीने परळी वैजनाथ रेल्वे प्रबंधक तुलसीराम मीना यांना निवेदन सादर करून करण्यात आली. महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये उस्मानाबादचे नामकरण धाराशिव, अहमदनगरचे अहिल्यादेवी नगर तर औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले. त्या नावाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची पुकारणी मात्र होत नव्हती. येथील रेल्वे प्रबंधक यांच्याशी विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही त्यामुळे मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक ३ मे शुक्रवार रोजी रेल्वे प्रबंधक यांना निवेदन सादर केले. याबाबत त्यांनी रेल्वे प्रबंधक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे पुकारण्यात येईल असे आश्वासन रेल्वे प्रबंधक यांनी दिले आहे. यावेळी मनोहर तिरडे, राहुल कांदे, रामचंद्र जोशी, मुंजाभाऊ गरड,काशिनाथ सरवदे, मुंजाभाऊ साठे, सोमनाथ दौंड, शिवा बडे, मोहन चव्हाण (पत्रकार), अनिल चौधरी, संतोष कांबळे, प्रवीण रोडे ,अनिल कातकडे, रवी आचार्य, योगेश मुंडे, देविदास मुंडे, विवेक मुंडे, वैजनाथ कांदे, राजाभाऊ गायकवाड, बालासाहेब चाटे, अमित डहाळे, रवी माने, विनायक शंकुरवार, भागवत गांगर्डे, बळीराम फड, प्रमोद पुरी यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.