Home गुन्हेगारी वासखेडी येथे गावगुंडांनी युवा मराठा न्युज चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना...

वासखेडी येथे गावगुंडांनी युवा मराठा न्युज चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना जिवे मारण्याची दिली धमकी….

109
0

आशाताई बच्छाव

1000332808.jpg

वासखेडी येथे गावगुंडांनी युवा मराठा न्युज चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना जिवे मारण्याची दिली धमकी….

धुळे/नंदुरबार – येथील युवा मराठा न्युज नेटवर्क चे विभागीय संपादक दिपक जाधव यांना साक्री तालुक्यातील वासखेडी येथील गावगुंड मुरलीधर दादाजी नेरकर व त्याचा मुलगा भावेश मुरलीधर नेरकर या पित्यापुत्रांनी , अश्लिल भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करून पत्रकारिता बंद न केल्यास ,दिपक जाधव यांना परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बातमी संकलनासाठी गेलेले असताना हा अनुचित प्रकार घडला, यावेळी असंख्य ग्रामस्थ देखील त्यावेळी तेथे उपस्थित होते,संबंधित गावगुंड मुरलीधर दादाजी नेरकर व भावेश मुरलीधर नेरकर हे गावात नेहमीच गुंडागर्दी करुन दहशत माजवीत असतात त्याशिवाय पोलीस आमचे काहीच करु शकत नाहीत असे बेताल वक्तव्य हे गावगुंड पितापुत्र गाव व परिसरात करीत असल्याने येथे कायद्याचे राज्य आहे की गावगुंड भाईगिरी करणारे शिरजोंराचे असा प्रश्न उपस्थित या घटनेतून निर्माण होत असला तरी आजच्या घटनेतील वासखेडी गावातील गावगुंड पितापुत्र यांना तात्काळ अटक करून पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे गंभीरपणे  त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून महाराष्ट्रातील कुठल्याही पत्रकार बांधवांना असे गावगुंड त्रास देणार नाहीत,असे देखील परीसरात चर्चा जोर धरू लागली आहे, यावेळी युवा मराठा महासंघ या संबधित घटनेचा जाहीर निषेध करत आहे,दिपक जाधव हे युवा मराठा महासंघाचे प्रदेश संघटक देखील आहेत,जर असे गावगुंड पत्रकार बांधवांवर जीवे मारण्याची धमकी देत असतील तर सर्वसामान्य माणसांचे काय ?असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे…                  .….तर प्रसंगी रस्त्यावर उतरणार – राजेंद्र पाटील राऊत “आज युवा मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक व युवा मराठा न्यूजचे विभागीय संपादक दिपक भाऊ जाधव यांच्यावर वासखेडी येथील गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व पोलीस प्रशासनाने तात्काळ नेरकर नावाच्या गावगुंडांना अटक करून त्यांची ग्रामीण भागातील दहशत मोडून न काढल्यास युवा मराठा महासंघ आचारसंहिता संपताच आंदोलनाच्या स्वरुपात रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here