Home बुलढाणा सिंदखेडराजा येथील “खादाड” तहसीलदार बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात

सिंदखेडराजा येथील “खादाड” तहसीलदार बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात

375
0

आशाताई बच्छाव

1000278272.jpg

सिंदखेडराजा येथील “खादाड” तहसीलदार बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात

ब्युरो चीफ बुलढाणा ज्ञानेश्वर पाटील दांदळे
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार या 3 तालुक्यातून खडकपूर्णा नदी वाहत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रिय आहे. अनेक वाळूमाफिया अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून सर्रासपणे वाळूची अवैद्य वाहतूक करत शासनाचा महसूल बुडवत आहेत सिंदखेड राजा येथील खादाड तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी एका वाळू माफिया कडून हप्त्याची मागणी केली होती. असा आरोप करत सदर वाळूमाफियाने त्याची तक्रार बुलढाणा एसीबी कडे दिल्यानंतर आज 12 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा तहसील कार्यालयात एसीबी कडून सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराला मागणीनुसार 35 हजार रुपये त्यांनी या खादाडांना दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने धाड टाकून तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यासह त्यांच्या वाहनावरील चालक व शिपाई अशे तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सध्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Previous articleनवनीत रानाच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलती; कडूंचाही भाजपला सवाल.
Next articleअमरावती लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षाच्या वरील वयवृद्धांचे व दिव्यांगाचे घरी जाऊन, मतदानाला आजपासून सुरुवात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here