Home जळगाव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…

116

आशाताई बच्छाव

IMG_20240317_074322.jpg

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…                                         चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 

राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी घेतला होता.

त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ आज माझ्याहस्ते करण्यात आला. येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होईल.

यावेळी तहसीलदार श्री. प्रशांत पाटील, नायब तहसीलदार श्री.जितेंद्र धनराळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर केली आहे
तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आले असून त्यात बहुवार्षिक पिके – २२५००/- प्रति हेक्टर, बागायत – १७५००/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – ८५००/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी १०० कोटींच्या वर मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या १५ दिवसांच्या आत सदर मदत वितरित केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो.

ऑगस्ट २०२१ मध्ये महापुरात घर जनावरे दुकाने जमीन खरडणे नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी निधी मंजूर झाला आहे,

त्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या होत्या अश्या १९ गावातील ५६७ शेतकऱ्यांना 80 लाख निधीचे प्राप्त आहे. येत्या ८ दिवसांच्या आत त्यांची नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा होईल.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.

ही भरघोस अशी मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो..!

– आमदार मंगेश रमेश चव्हाण

Previous articleमोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे मताधिक्य देणार –
Next articleजिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू;अमरावती लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिलला मतदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.