Home जळगाव मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे...

मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे मताधिक्य देणार –

178

आशाताई बच्छाव

IMG_20240317_073932.jpg

मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे मताधिक्य देणार –

चाळीसगाव भाजपच्या बैठकीत निर्धार

स्मिताताईंच्या उमेदवारीच्या रूपाने नारीशक्तीचा सन्मान – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव,-विजय पाटील प्रतिनिधी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश तात्या सोनवणे, संजय भास्करराव पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेशभाऊ स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषरावबापू पाटील, जगनअप्पा महाजन, महिला मोर्चाच्या देवयानीताई ठाकरे, संगीताताई गवळी, मार्केट सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, प्रा.सुनील निकम सर, नितीनभाऊ पाटील, घृष्णेश्वर तात्या पाटील, शेतकी संघाचे अविनाशनाना चौधरी, विवेक चौधरी, अमोल चव्हाण, अमोल नानकर, गिरिष बरहाटे, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज गोसावी, तालुक्यातील भाजपचे, सुपर वॉरीयर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की, २०१४ नंतर भारताच्या विकासाला मिळालेली गती व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं काम पाहून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतात ३०० हून अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर गेल्या ५ वर्षात पंतप्रधान मोदिजींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा डंका वाजत आहे. त्यामुळे भारताला विकसित देश करण्यासाठी मोदिजींचे हात बळकट करणे गरजेचे असून “अबकी बार ४०० पार” चा नारा पक्षाने दिला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपा महायुतीचा बालेकिल्ला असून पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केलं आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या श्रीमती स्मिताताई वाघ यांना नेतृत्वाने उमेदवारी दिली असून खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान केला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त १ लाखांचा लीड हा स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघातून राहील असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

Previous articleलोकसभा निवडणूकीत महिला मतदारांचा टक्क वाढविण्यावर विशेष भर – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
Next articleदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.