
आशाताई बच्छाव
💠नाव: अँड.सौ विनया अमित नागरे (बनसोड)
💠गाव :-नाशिक
💠 मोबाईल नं.:-8459921958
💠 काम:- नाशिक कोर्ट मध्ये, कौटुंबिक केस, दिवाणी केसेस, क्रिमिनल केसेस तसेच अनेक महिलांचे मोटिवेशन करून त्याचे घटस्फोट होण्यापासून थांबवले आहे तसेच 140 कुटुंबाचे घटस्फोट करून न देता समझोता घडवून आणलेला आहे.
💠 कामाचे स्वरूप आणि व्याप्ती :- वकील व्यवसाय
सामाजिक कार्य (गरीब मुलांना मोफत शिक्षण दत्तक घेतलेल्या आहे.
१)युवा धर्मेंद्र गुरुकुलम चारिटेबल सोसायटी ही संस्था 2008 पासून माझे मिस्टर अमित नागरे व त्यांचे गुरु प्रेमानंद स्वामी यांनी सुरू केलेले आहे या संस्थेच्या अंतर्गत आजपर्यंत आम्ही 108 मुलांना दत्तक घेतलेले आहे तसेच त्याचे पहिले शाखा ऋषिकेश दुसरे शाखा नागपूर व तिसरे शाखा जळगाव व चौथी शाखा गेल्यास एक वर्षभरापासून नाशिक येथे चालू केलेली आहे.
२) या संस्थेअंतर्गतच आम्ही गरीब मुलांना तसेच आदिवासी मुलांना शालेय साहित्याचे वाटप केलेले आहे आणि तेथील वाटप केलेले आहे
३) मी स्वतः या संस्थेची डायरेक्टर असल्यामुळे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट ला विविध शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप व खाऊचे वाटप करून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश पुरविले आहेत.
४) या संस्थेचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष म्हणजे माझे पती यांनी मिळून नागपूर येथे देखील 120 मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय केलेले आहे. समाज कार्य करला हा एक आपला उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने जसे जवळील तसे प्रत्येकाला सहकार्य करण्यात हे माझे आद्यकर्तव्य मी समजते या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो त्या अनुषंगाने गेल्या आठ दिवसापूर्वी वेल्लोळीचा रस्त्यावर एक पंधरा दिवसाचे मूल आढळून आले त्यावेळी तेथील लोकांनी आमच्याशी संपर्क साधला असता त्या मुलाला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करून त्याचे योग्य मेडिकल तपासणीसाठी पाठविलेले आहे.
💠आयुष्यातील पुरस्कार :-
1) छावा जनक्रांती संघटना यांच्याकडून नुकताच राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे.
२) मनुमानसी संस्थेकडून नारीशक्ती सन्मान मिळालेला आहे
३) सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपले रुग्णसेवा यांच्याकडून सन्मान करण्यात आलेला आहे.
४) तसेच विविध संस्थांनी कामाची दखल घेऊन विविध फलने सन्मानित केलेले आहे
५) महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या कडून सुकन्या पुरस्कार जाहीर झालेला आहे.
६) युवा मराठ्याचे पत्रकार असल्यामुळे क्षेत्रात देखील उल्लेखनी कामाबद्दल सन्मानित करण्यात आलेला आहे.
७) स्वतःचा कार्याबद्दल लिहिणं हे योग्य नाही परंतु अहवाल मागवला जातो त्यामुळे लिहिले जाते पण सामाजिक कार्य आहे करताना आपण समाजाचे एक भाग समजूनच मी स्वतः समाजाचा कार्य करत असते आणि त्या समाजासाठी मला काम करण्याची संधी मिळाली की त्यातुन ही शिकायला मिळाते.समाजातील स्त्रीयांना कायदा काही समस्या असेल तर मी वकील असल्यामुळे कोणालाही कोणत्याही कामाचे काही अडचण असेल कायद्याचे तर सर्वजण संपर्क साधतात व मला जसे जमते तसे मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते.