
आशाताई बच्छाव
छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडे तालुका मंगळवेढा यांचे वतीने महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार अकोले खुर्द येथील माळी वस्ती प्रशालेस पुरस्कार प्राप्त
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप सोलापूर.
सोलापूर
छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडे तालुका मंगळवेढा यांचे वतीने महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार अकोले खुर्द माळी वस्ती तालुका माढा या प्रशालेस एकमेव पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढवळे विद्यमान आमदार समाधान आवताडे साहेब संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश पवार गुरुजी उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते शिक्षण अधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रशालेस अकोले खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने प्रतिवर्षी निधी प्राप्त झाला असून ग्रामपंचायत सरपंच रुपालीताई नवले सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे माध्यमातून माजी सरपंच महादेव घाडगे यांच्या सहकार्यातून ग्रामस्थांच्या सहकार्यातून शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांचे माध्यमातून शाळेमध्ये सर्व सुख सोई केलेल्या आहेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय बोअर ,विद्युत मोटार, पाण्याची पाईप लाईन ,पाण्याची टाकी ,आरो फिल्टर, पाण्याची उत्तम सुविधा, सुंदर किचन शेड, भरपूर विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेमध्ये सुंदर फरशी, रंगकाम, सुविचार, भिंतीवर डिझाईन, चित्रकृती, महा मानवांचे फोटो, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स, हवेसाठी फॅन, डिसले सरांचा डिजिटल बोर्ड ,संगणक, टीव्ही संच, कपाट, खुर्ची ,टेबल, खेळाचे साहित्य, लेझीम ,डंबेल्स, स्पीकर साऊंड सिस्टिम ,वॉश बेसिन, टॉयलेट, भिंती वरती वॉल कंपाऊंड सुविचार ,हिरवीगार दाट झाडी, सुशोभित स्वच्छ ग्राउंड ,इत्यादी सर्व सोयीने युक्त असणारी माळी वस्तीवरील शाळा या शाळेस स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार मिळाला असून या प्रशालेतील मुख्याध्यापक श्री नामदेवराव जगदाळे सर श्री बुधवंत सर यांनी सर्वच विषयांमध्ये अतिशय परिश्रम घेऊन शाळा नावारूपास आणली विद्यार्थी घडवले या प्रशालेस विविध कार्यासाठी ग्रामस्थांचे भरपूर सहकार्य नेहमीच लाभत असते पालक शिक्षक ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्यामुळेच हा पुरस्कार आमच्या प्रशालेस प्राप्त झाला असे मत श्री जगदाळे सर, बुधवंत सर, यांनी व्यक्त केला हा तालुक्यातील एकमेव बहुमोल सुंदर स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेतील मुख्याध्यापक श्री जगदाळे सर बुधवंत सर यांचे अकोले खुर्द ग्रामपंचायत ,सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग ,सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली महादेव घाडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर घाडगे माझी अध्यक्ष उत्तम घाडगे प्रशालीस नेहमीच सहकार्य करणारे हनुमंत घाडगे साहेब त्यांच्या पत्नी सौ सारिका मॅडम उपस्थित होते.