
आशाताई बच्छाव
मैत्रीचे नाते प्रत्येकाने प्रामाणिकपणे जपणे गरजेचे
मैत्रीत प्रामाणिकपणा व मोकळं बोलण्यातील मजा औरच असते.आपण मैत्री खूप सहजपणे करतो ..पण तशीच टिकवून ठेवणे सगळ्यांना च जमते अस नाही. मैत्री तुटू शकते गैरसमज ह्यांनी केव्हा,कुठे, कधी कसा मैत्रीत गैरसमज निर्माण होईल काहीच सांगता येत नाही. पण जर एकमेकांवर विश्वास असला तर मग गैरसमजाला मैत्रीत स्थान नाही. मैत्रीत “विश्वास, त्याग आणि एकमेकांना त्याची space देणं ,आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनात जे असेल ते मोकळेपणे एकमेकांना सांगणं फार गरजेचे आहे . ह्या गोष्टी मुळे मैत्री ही life long टिकून राहते. पण ह्या गोष्टी दोघांकडून सारख्या प्रमाणात असाव्या.अनेकांची मैत्री करण्याची पद्धत वेगळी असते. बहुतेकजण पुस्तकासोबत आपली मैत्री करतात. काही जण निसर्गाला आपण मित्र मानतात तर काही जण मुक्या प्राण्यांमध्ये आपले मित्र -मैत्रिणी शोधू पाहतात, कधी कधी अशी मैत्रीही आपल्याला निर्मळ आनंद देते.मैत्री समज देणारी असावी. गैरसमज वाढवणारी नसावी,मैत्री कौतुकास्पद असावी,संशयास्पद नसावी मैत्री विश्वसनीय असावी, अविश्वसनीय नसावी मैत्री खोडकर असावी,बंडखोर नसावी मैत्रीत वाद असावा,राग नसावा मैत्रीत परखडपणा असावा, परकेपणा नसावा मैत्रीत प्रमाणिक पणाला वाव असावा, अविर्भाव नसावा मैत्रीत उपकार असावा. वर्षांनुवर्षे मैत्री ही अशीच चालू राहील, पिढ्या बदलल्या, माणसं बदलतील ,जग बदलेले तरीही मैत्री हे अस नात आहे जे कधीच बदलणार नाही आणि ते बदलूच शकत नाही म्हणूनच मैत्रीचं नातं सर्वांनी जपायला हवं !!!
रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष-वारकरी मंच महाराष्ट्र राज्य