
आशाताई बच्छाव
स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर पुण्यतिथी विशेष —
निधन नव्हे तर आत्मार्पण
२६ फेब्रुवारी१९६६रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आत्मा भारत माते चरणी समर्पित केला पण सावरकर हे आपल्यातून गेले नाहीत तर ते आज सुद्धा आपल्यामध्ये विचारांच्या माध्यमातून आहेत सावरकरांवर अनेक चिखल फेक झाली पण सावरकर त्याकाळी सुद्धा पवित्र चरित्र संपन्न होते व आज सुद्धा आहेत सावरकरांचे विचारातून हिंदुत्व राष्ट्रभक्ती पृथ्वीभक्ती गो भक्ती जागृत होते बॅरिस्टर असूनही नोकरी न करता आपल्या भारत मातेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे वयाच्या 26 व्या वर्षी 26 ग्रंथ लिहून झालेले होते स्वतंत्रसंग्रामातील सावरकरांची भूमिका नेहमी दिमाखात राहिली आहे सावरकरांचे साहित्य विचार आचार चरित्र नेहमी युवा तरुणांसाठी प्रेरणादायी राहील पण त्यासाठी तरुणांनी सावरकरांच्या साहित्यामध्ये तन मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे सावरकरांना ज्यावेळेस वाटू लागलं की आपला या देहाचा आता देशासाठी शून्य उपयोग राहिला त्यावेळी त्यांनी आपले स्वयसायक श्री बाळाराव सावरकर यांना जवळ बोलावून समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रायोअर्पण निर्णय घेण्याचं सांगितलं पण बाळाराव म्हणाले देशाचा तरुणाला तुमची गरज आहे त्यावेळी त्यानी सांगितले देशाचा तरुणासाठी माझे विचार तयार आहे फक्त तरुणाला ज्या विषयात अडचण आली त्याने त्या विषयासंबंधीतील माझं पुस्तक वाचवा त्याला प्रश्नाचे उत्तर मिळेल असे सांगितले व व प्रयोअर्पणाचा निर्णय अमलात आणायला १फेब्रुवारी पासून २६ फेब्रुवारी पर्यंत अन्नपाण्याचा त्याग केला व 26 फेब्रुवारी रोजी आपला देह भारत मातेसाठी समर्पित केला .सावरकरांचे माझी जन्मठेप, काळे पाणी, हिंदुत्व,क्रांतीघोष,भाषाशुध्दी,विज्ञाननिष्ठ निबंध,१९५७चे समर आसे ५०सुन आदिक ग्रंथ प्रसिद्ध आहे.तसेच सागरा प्राण तळमळला,जयोस्तुते,छत्रपती शिवाजी महाराजांची आरती असे हजारो काव्य प्रसिद्ध आहे. आशा साहित्यवीर,काव्यवीर,नरवीर, विचारवीर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन….
लेखक:सावरकर विचारवंत ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली ठाकरे धामोरी