Home Breaking News मोबाईल साधा सोपा…! पण… आता तुमची करणार पोलखोल…!!

मोबाईल साधा सोपा…! पण… आता तुमची करणार पोलखोल…!!

263
0

आशाताई बच्छाव

IMG_20240224_215139.jpg

मोबाईल साधा सोपा…!
पण… आता तुमची करणार पोलखोल…!!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव – विज्ञानयुगात तंत्रज्ञानाने खूप काही प्रगती केली असली आणि सर्वसामान्य माणसाला मोबाईलच्या मायाजाळात “स्मार्ट”बनविले असले तरी आता मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
आजपर्यंत मोबाईल फक्त एक चैनीची व गरजेची वस्तू म्हणून जे लोक या मोबाईलकडे पाहत होते आणि मोबाईलला सहजपणे साधा सोप्पा समजून आपले दैनंदिन व्यवहार पार पाडीत होते.त्यांना आता बहुधा हे देखील माहित नसेल की, कालपर्यंत ज्या मोबाईल वरून आपण सहजासहजी कुणालाही खोटे बोलून सांगून जायचो की,अमूक गावाला आहे तमूक ठिकाणी आहे.या सगळ्या खोटेपणाच्या प्रकाराला आता आळा बसणार असून, गुगलने यावर पर्याय शोधला असून आपले थेट लोकेशन दरमहा आपण कुठे होतो? कोणत्या गावाला अथवा कोणत्या हाँटेलमध्ये किती तारखेला किती वाजेपासून किती वाजेपर्यंत थांबलो होतो या सगळ्यांची पोलखोल आता होणार असल्याने खोटे बोलणा-यांचे मात्र गुगलच्या या निर्णयामुळे धाबे दणाणले आहे तर खरे वागणा-यांना या गुगलकडून दरमहा महिनाभराचे मिळणाऱ्या लाईव्ह लोकेशन मुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.दरम्यान “युवा मराठा”ने काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता बहुतेक जणांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की,गुगलचे हे दरमहा महिनाभरातील आपले लाईव्ह लोकेशन प्रदशिर्त करणे म्हणजे हा व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

Previous articleविद्यार्थ्यांच्या करिअरसाठी परिसर मुलाखतीची आवश्यकता – गिरीश देशपांडे.
Next articleनिमगाव (पहेला )येथे देवस्थान पंच कमिटी व ग्रामवासी यांच्या वतीने घटस्थापना व गोपालकाला कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here