आशाताई बच्छाव
वनसगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अभिजीत अरुण पाटील शिंदे तर मुख्य प्रचारक म्हणून पत्रकार रामभाऊ आवारे सर यांची एकमताने निवड
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांची 19 फेब्रुवारी रोजी होणारी शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी या उद्देशाने प्रेरित होऊन वनसगाव येथील खंडेराव मंदिरासमोर एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारणी करण्यात यावी अशी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती व तरुणांनी विचार मांडले. यावर सर्वांमध्ये शिक्कामोर्तब करण्यात येऊन अध्यक्षपदी द्राक्ष उत्पादक तथा नांदुर्डी विद्यालयाचे शिक्षण समिती सदस्य युवा शिवभक्त अभिजित अरुण शिंदे पाटील यांची तर शिवजयंती उत्सव समिती प्रचारक तथा प्रसिद्धीप्रमुख म्हणून वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष शरद एकनाथ शिंदे व सागर बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
यावेळी पुढीलप्रमाणे उत्सव समिती करण्यात आली
अध्यक्षपदी शिवभक्त अभिजित अरुण शिंदे पाटील,
उपाध्यक्षपदी शरद एकनाथ शिंदे व सागर बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष उत्तम निवृत्ती जाधव व आकाश श्रावण डुंबरे , खजिनदार सरपंच महेश गणपत केदारे व नंदकुमार रंगनाथ शिंदे, प्रसिद्धीप्रमुख तथा प्रचारक पत्रकार रामभाऊ आवारे सर, *सदस्यपदी* -नितीन दौलत शिंदे, लहुजी आबाजी शिंदे, नारायण बाळासाहेब शिंदे, मंगेश शिवाजी शिंदे, योगेश रतन शिंदे, योगेश एकनाथ डुंबरे, गौरव प्रभाकर शिंदे, बाजीराव अंबादास कापडी, मयुर शशिकांत जाधव, किरण बाबासाहेब शिंदे, प्रसाद एकनाथ शिंदे, गणेश बाजीराव शिंदे, सागर आप्पाजी शिंदे, प्रथमेश गणपत डुंबरे, शेखर किसन कापडी,अरुण सुदाम शिंदे ,संकेत सुभाष शिंदे , दिपक संपतराव कापडी. रमेश सुभाष शिंदे, नामदेव बाळासाहेब शिंदे, सोमनाथ दामू शिंदे, सुनिल निवृत्ती शिंदे आदींची या उत्सव समिती त एकमताने निवड करण्यात आली आहे.
–