Home नांदेड देगलूर महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी दत्तात्रय बडूरे यांना पीएच डी प्रदान.

देगलूर महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी दत्तात्रय बडूरे यांना पीएच डी प्रदान.

128

आशाताई बच्छाव

IMG_20240117_211616.jpg

देगलूर महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी दत्तात्रय बडूरे यांना पीएच डी प्रदान.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :येथील अ.व्या.शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूरचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या महाविद्यालयाने तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमेवर मराठी अस्मिता जोपासत यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठी तेलगु आणि कन्नड या त्रैभाषिक रसायन असलेल्या मुलुखात मराठी भाषा संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी मराठी विभाग प्रयत्नशीलआहे. भाषा संशोधनासाठी मराठी भाषा – साहित्य संशोधन केंद्र कार्यरत आहे. या अंतर्गत संशोधक प्रा. दत्तात्रय मष्णाजी बडुरे यांनी मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जम्बाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. याकरिता त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याकडे “सदानंद देशमुख आणि बाबाराव मुसळे यांच्या कादंबऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.
संशोधकांचे अभिनंदन अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागिरे, कोषाध्यक्ष विलास तोटावार, सहसचिव सूर्यकांत नारलावार, राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उनग्रतवार, जनार्दन चिद्रावार, गोविंदप्रसाद झंवर, रवींद्र द्याडे, प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार,उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे आणि गोविंद जोशी , शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापक वृंद यांनी करीत आहेत.

Previous articleराष्ट्रीय महामार्ग क्रं 63 अंतर्गत उदगिर -देगलुर- अदमपुर-सगरोली -बोधन रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करण्याची मागणी.
Next articleकरडखेड येथे महर्षी राजा भगीरथची जयंती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.