आशाताई बच्छाव
महिला उपासीक , शिक्षक ,श्रामनेर भिक्षू शिबिर कार्यक्रम संपन्न
सातारा( संजीव भांबोरे ) बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा कराड शाखेच्या वतीने महिला उपासीका, शिक्षक व श्रामनेर भीक्षु दहादिवसीय शिबिर बौद्ध समाज सभागृह बुधवार पेठ कराड येथे संपन्न झाला.या शिबिराचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतपूज्य भंते उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विसूबद्ध बोधी केंद्रीय शिक्षक ,अनिलजी शिंदे व केंद्रीय शिक्षिका सरिता लवादे, सिद्धी सोनवणे, बांधकाम अध्यक्ष बी. आर.थोरवडे साहेब उपस्थित होते. श्रामनेर भिक्षू आगाने काका यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कराड तालुका अध्यक्ष विजय माने सर, सरचिटणीस यशवंत अडसुळे सर( आप्पा), कोषाध्यक्ष सजींव लादे,उपाध्यक्ष आर.बी.पाटनकर, कार्यसचिव भीमराव मोहिते सर, माजी जि. प. अध्यक्ष भीमराव गायकवाड गुरुजी, संघटक आर. पी. मेश्राम सर, विश्रांती भंडारे ग्लोरी क्लासेस चे प्रो. प्राध्यापक राजकन्या मेश्राम मॅडम, भारतीताई लादे, प्रियंका थोरवडे, नंदकुमार भोळे, व बौद्ध उपासक उपासीका यांनी उपस्थिती दर्शवून व परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.