राजेंद्र पाटील राऊत
व-हाणे ग्रामपंचायतीची अशीही बनवाबनवी,मनात येईल तशी चालली मनमानी!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शेजारील व-हाणे ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारासोबतच विविध मुद्द्यावर येत्या ९ नोव्हेंबर पासून होणारे पाणी सत्याग्रह आमरण उपोषण आंदोलन अटळ असून आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही असा ठाम निर्धार युवा मराठा महासंघाने घेतला आहे.
व-हाणे गाव हे गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या प्रश्नांवर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.व-हाणे ग्रामपंचायतीची अनेक प्रकरणे बोगस व बनावट असल्याचे प्रशासनाला उघडया डोळ्यांनी दिसत असताना सुध्दा प्रशासन मात्र डोळ्यावर कातडं पांघरुन वेडयाचे मत घेत आहे.
व-हाणे प्रश्नाला खरी सुरुवात सार्वजनिक पाणपोईच्या जागा मागणीवरुन झालेली आहे.युवा मराठा परिवार व आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या ताब्यात असलेल्या या जागेवर सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन दस्तुरखुद्द तेथील तत्कालीन ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे व तत्कालीन सरपंच श्रीमती संगिता पवार यांनी केले व ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगवर सदरची जागा गावठाण असल्यामुळे पुढील ग्रामसभेवर त्याचा निर्णय करण्याचा मासिक ठराव पास करुन ठेवला.
मात्र ग्रामसेविका सांळुखेनी पुढील ग्रामसभांवर तो निर्णय व विषय घेतलाच नाही.यामागचे खरे राजकारण सुवर्णा सांळुखेनाच माहिती असावे.वास्तविक सदरच्या जागेपोटी सुवर्णा सांळुखेंनी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या सचिव आशाताई बच्छाव यांचेकडून रोख पन्नास हजार रुपये घेऊनच सदरची जागा ताब्यात दिलेली आहे.व तेथे सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन स्वतः सुवर्णा सांळुखे यांनी केले.तेव्हापासून आजतागायत सदर जागेवर सार्वजनिक पाणपोई हि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व जाती धर्माच्या पांथस्थ वाटसरुना पाणी पाजण्याचे महत कार्य या माध्यमातून सुरु असताना,या सार्वजनिक पाणपोईला नळ कनेक्शन मिळावे म्हणून रितसर नियमानुसार व-हाणे ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यावर व-हाणे ग्रामपंचायतीने गेल्या काही दिवसापूर्वी एक ठराव पाठवून कळविले आहे की, निवासस्थान असलेल्या व ज्याचेकडे स्वतंत्र उतारा आहे त्यांनाच नळ कनेक्शन दिले जाते.एक वेळा ग्रामपंचायतीचे हे म्हणणे खरे मानले तरी,प्रश्न उरतोच व-हाणेतील पशूवैद्यकीय दवाखाना नेमका कुणाच्या निवासस्थानासाठी आहे की तेथे नळ कनेक्शन देण्यात आले आहे.त्याशिवाय मंदीरात कोणते निवासस्थान आहे तेथेही नळ कनेक्शन जोडण्यात आले आहे.तसेच गावात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर अनेकांनी बोगस व बेकायदेशीर नळ कनेक्शन जोडून ठेवलेले आहेत.मग तेथे हा नियम का लागू नाही? त्याशिवाय नेहमीच बोगस व खोटे कामे करण्यात माहिर असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीने युवा मराठा महासंघाने ९ तारखेचे नियोजित पाणी सत्याग्रह आमरण उपोषण आंदोलन करु नये म्हणून आपल्या सचिवा मार्फत एक पत्र पाठवून आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत.आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेने मागणी केलेल्या नळ कनेक्शन जोडणीला व-हाणे गावात पाणी टंचाई असल्याने व गावी टँकर सुरु असल्यामुळे नळ कनेक्शन जोडणी देता येत नाही असे म्हटले आहे.किती हा लबाडीचा कारनामा व बेबनाव गावात जर खरोखरच पाणी टंचाई आहे तर मग पशूवैद्यकीय दवाखान्याच्या पाण्यावर कोण फुक्कटची मौजमजा करीत आहे? हि शासनाची दिशाभूल कुणासाठी? त्याशिवाय गावातील मंदीराला सुमारे एक इंची नळ कनेक्शन देऊन गावात मात्र अर्धा इंची कनेक्शन देण्यात आलेले आहेत.म्हणजे येथेही जीवंत माणसापेक्षा पाषाणाचा देव महत्त्वाचा ठरला आणि त्या पाण्याचा नेमका फायदा कुणाला याचेही स्पष्टीकरण व-हाणे ग्रामपंचायतीने केले पाहिजे.एका बाजुला पाणीटंचाईचे कारण दाखवायचे दुसऱ्या बाजुला मंदीराच्या नावाखाली व पशूवैद्यकीय दवाखान्याचे पदराआड लपून जो पाण्याचा वाह्यात अपव्यय सुरु आहे.तो कुणासाठी? कुणाचे लाड पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीचा हा खेळ सुरु आहे.रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरु पांथस्थ जीवंत माणसांना पिण्यासाठी पाणी द्यायला नळ कनेक्शन देताना व-हाणे ग्रामपंचायतीला केवढी हि बनवाबनवी खेळावी लागत आहे.हे…महामानवा तु पाजलेस अस्पृश्यांना पाणी आणि दिला चवदार अधिकार चवदार पाणी चाखण्याचा.पण…सर्व जातीधर्मासाठी चालणाऱ्या पाणपोईला नळ कनेक्शन नाकारणा-या जातीयवादी व-हाणे ग्रामपंचायतीचा खरा चेहरा आता उघड होईल.पाणी सत्याग्रह उपोषण आंदोलनातूनच! आर या पार शिवाय आता पर्याय नाही.यावर्षीची दिवाळी आश्रयआशा फाऊंडेशन आणि युवा मराठा परिवार व-हाणे ग्रामपंचायतीच्या सातत्याने अडवणूक करणे आणि मालेगांव पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना सगळे काळे कारनामे उघड उघड दिसत असतानाही,वेडयाचे सोंग घेणे याचा अंतीम निर्णय येईपर्यंत “काळी दिवाळी” म्हणून पाणी सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून साजरी करण्याचा निर्धार शेवटी युवा मराठा महासंघाने केला आहे.