आशाताई बच्छाव
प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा लढणार? असे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या अमरावती राखीव, अन्यथा येथूनच लढण्याचा आग्रह केला असता.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती.
पी एन देशमुख.
अम.विभागिय संपादक.
अमरावती.
काँग्रेस नेते प्रियंका गांधी आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रियंका यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या एका विधानामुळे ही चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर राज्य काँग्रेसमध्ये एकच हालचाली वाढल्या. अनेकांनी आपला मतदारसंघ प्रियंका साठी खून खुला असल्याचे संकेत दिलेत. यात आता काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचीही भर पडली आहे.
प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचे स्वागतच करतो. माझा अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. म्हणून अडचण आहे. अन्यथा प्रियंका गांधी यांच्याकडे मी अमरावतीतूनच लढण्याचा आग्रह धरला असता, असे यशोमती ठाकूर यांनी आज मंगळवारी याविषयी स्पष्ट केले. मूवीआ म्हणून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विषय पत्रकारांनी यशोमती ठाकूर यांना छेडले असता त्यांनी २०२४ची सर्वत्रिक निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले. सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा हा दौरा महाविकास आघाडीला उभारी देणार ठरणार आहे. आम्ही आगामी लोकसभा निवडणूक महा विकास आघाडी म्हणून एकजूटपणे लढणार आहे. असे माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. आचार्य प्रमोद यांनी काल मुलाखत दिली. प्रियंका गांधी देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी आपल्या राज्यातून निवडणूक लढवावी, असे विविध राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना वाटते की, त्यांनी तेथून लढवावी. राजस्थानच्या लोकांचाही असाच आग्रह आहे. महाराष्ट्रातही मागणी होत आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रातील लढू शकतात. त्यात कुठेही लढल्या, तर सहज जिंकून येतील पण याविषयी अंतिम निर्णय त्या स्वतः घेतील, असे आचार्य प्रमोद कृष्ण म यांनी म्हटले होते