आशाताई बच्छाव
मेळघाटातील पत्रकार बंधुंनी केली समाज सेवा
कुटुंबापासून दहा ते बारा दिवसापासून दूर असलेली मनोरुग्ण महिला याला केले कुटुंबाचा स्वाधीन
चिखलदरा:- नागेश धोत्रे
मेळघाटातील अनेक ज्वलंत समस्या आपल्या लेखणीतून रोखठोक मांडणारे चिखलदरा तालुक्यातील पत्रकार मंडळींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सविस्तर वृत्त असे की,श्रीमती सुनीता नत्थू पाटीदार दोन वर्षांपासून मनोरुग्ण आहे.सदर महिलेचे मूळ गाव मध्यप्रदेश राज्यातील नवापुर हे आहे.नवापुर गाव हे बैतुल जिल्यात मोडत असून भैसदही तालुका आहे.मनोरुग सुनीता पाटीदार याचे लग्न काही वर्षापूर्वी खंडवा जिल्ह्यातील शिरसोड या गावी माधव पाटीदार गाव याचा सोबत झाला होता.काही दिवसांनी एका गोडस बाळाला सुनीताने जन्म दिला.मनोरुग्ण सुनीता आणि माधव यांच्या सुखी संसार चालू होता.परंतु अचानक माधव यांच्या काही गुंड लोकांनी त्याचा डोळ्यासमोर खुन केला. तिच्या डोळ्यासमोर हे सर्व प्रकार घड़ल्यामुळे ,तिच्या पती माधवाचा मृत्यू सहन न झाल्याने सुनीता मानसिक दृष्टि मनोरुग्ण झाली.मनोरुग्ण सुनीता हि गावोगावी भटकत आहे.भटकत भटकत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जारीदा या गावी हि मनोरुग सुनीता पोहचली होती.जारीदा गावातील प्रवाशी निवाऱ्यात मनोरुग्ण सुनीता हि आठ दिवसांपासून राहत होती.पत्रकार मंडळींना माहिती मिळाली की,कोणीतरी अनोळखी महिला हि आठ दिवसांपासून प्रवाशी निवारा जारीदा येथे राहत आहे.पत्रकार प्रशांत भाऊ पंडोले ,महिला मुक्ती मोर्चा चिखलदरा तालुका अध्यक्ष व पत्रकार नितिन भाऊ वरखड़े, पत्रकार मंगेश निवतकर यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवाशी निवारा जारीदा येथे सदर महिलेची भेट घेतली व सर्वप्रथम या महिलेला चहा ,नास्ता ,बिस्किट खाऊ घातले व तिच्याशी बोलले की तु आमची बहिन आहे आम्ही तुझे भाऊ.भिण्याचे काही कारण नाही असे म्हटल्यावर सुनीता या महिलेकडून संपूर्ण माहिती घेतली. मनोरुग सुनीता पाटीदार याने ती पहिले खंडवा येथे राहत होती आणि आता नवापुर येथे राहत आहे अशी माहिती दिली.मनोरुग्ण यांची माहिती प्रमाणे भैसदही येथील त्यांचे सहयोगी मित्र गणेश राय पत्रकार यांच्या सोबत संपर्क साधून मनोरुग्ण सुनीता ची माहिती त्याचा मोबाईल वर फोटो,व्हिडीओ पाठविण्यात आले.गणेश राय यांनी तात्काळ पोलीस स्टेशन भैसदही येथे मनोरुग्ण सुनीताची माहिती दिली.टी.आय. अंजना धुर्वे मॅडम यांनी सांगितले की आमचा ठाण्यात कोणती महिला लापता आहे अशी तक्रार असेल तर तुम्हाला सांगतो.पोलीस ठाणे भैसदेही येथे सुनीता पाटीदार लापता आहे.अशी तक्रार मनोरुग सुनीताची आई सुमन पळलक यांनी नोंद केली होती.सुमन पळलक हि भेसदैही पोलिस स्टेशन चा समोरच चहा विक्री चा व्यवसाय करते.अश्या प्रकारे मनोरुग्ण सुनीता पाटीदार याची ओळख पत्रकार मंडळींचा मदतीने पटली. पत्रकार मंडळींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.प्रशांत पंडोले पत्रकार,नितीन वरखडे पत्रकार,मंगेश निवतकर,गणेश राय पत्रकार भैसदही, फैजान पठाण याच्या सहकार्याने मनोरुग्ण सुनीता पाटीदार यांना त्याचा कुटुंबाचा स्वाधीन केले व सुनीता यांचा कुटुंबाने सर्व पत्रकार बंधुंचे आभार मानले.






