Home नांदेड खोटे गुन्हे मागे घेऊन षडयंत्र रचणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी

खोटे गुन्हे मागे घेऊन षडयंत्र रचणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी

163

आशाताई बच्छाव

IMG-20230805-WA0146.jpg

खोटे गुन्हे मागे घेऊन षडयंत्र रचणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी
लोहा,(प्रतिनिधी)
लोहा शहरात गेली दोन दिवसा खाली अण्णाभाऊ साठे जयंती व खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या प्रकरणी घडलेल्या घटने संदर्भात आज दि.(५) आगस्ट रोजी शहरातील व्यापारी,मराठा समाज व भाजपा सह अन्य पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे लोहा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उन्हाळे यांना नवेदना द्वारे शहरातील शांतता व सुव्यवस्था यांना गालबोट लागत असलेल्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी व मुकदम-चव्हाण, वाले, नागेश्वर यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी व शहराच्या शांतताप्रिय तेची व एकोप्याची परंपरा बिघडविणाऱ्या विरुद्ध व षडयंत्र रचणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद केले आहे की, प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अण्णाभाऊ साठे जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली.सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले.एक ऑगस्ट रोजी जयंती व दुसऱ्या दिवशी दि.(२) ऑगस्ट रोजी खासदार चिखलीकर साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे जयंती विसर्जनानंतर पहाटेच्या वेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती च्या कमानी ,बैनर काढून वाढदिवसाचे लावण्याचे गेली वीस वर्षापासून असतांनाच सर्व शहराला माहिती आहे.यापुर्वी कधीच वादही झाला नाही.परंतु यंदा जाणिव पूर्वक सचिन मुकदम-चव्हाण, दत्ता वाले, शैलेश नागेश्वर यांच्यावर बैनर विटंबना केल्याची तक्रार ठाण्यात देण्यात आली.परंतु शहरात सर्वच महामानवाच्या जयंत्या एकोप्याने व वाद विटंबना न होता शांततेत साजरे होतात.संबंधीत मुकदम कुटुंबीयांनी कधीच जातीवाचक बोलल्याची किंवा वाले यांनी, शैलेश नागेश्वर हा कमानी व बैनर लावण्याचे रोजंदारी वर गेले १० वर्षा पासुन उपजिविकेसाठी काम करतो.परंतू काही जणांनी ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले.खोटेनाटे जोडून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लक्षवेधी केली. त्यामुळे शहर व तालुक्यात सामाजिक वातावरण बिघडले. नाहक बदनामी करून दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. मुकदम व वाले कुटुंबीयांची बदनामी केली. अशा लोकांमुळे गावातील एकोपा सहकार्य वृत्ती अनेक वर्षाचे जाती धर्मातील संबंध ताणले गेले. तेव्हा अशा ठिकाणी खोर वृत्तीच्या व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर उचित कार्यवाही करुन व केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत रद्द करावेत. चितावणीची भाषा वापरून दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे हेतूने षडयंत्र असणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करावी. अन्यथा शांतता प्रिय व व शहराची एकोप्याची परंपरा बिघड इंडिया विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
सदरील निवेदन लोहा पोलीस ठाण्याचै पोलीस निरीक्षक उन्हाळे यांना देण्यात आले.निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी नांदेड, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, तहसीलदार लोहा यांना देण्यात आले यावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleदहिवडी पोलिसांनी लावला दारूच्या अड्याला सुरुंग..! सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या टीमची सर्वात मोठी कारवाई..!
Next articleकिरोडा घाटात रस्ता अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.