Home सातारा दहिवडी पोलिसांनी लावला दारूच्या अड्याला सुरुंग..! सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या...

दहिवडी पोलिसांनी लावला दारूच्या अड्याला सुरुंग..! सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या टीमची सर्वात मोठी कारवाई..!

333

आशाताई बच्छाव

Screenshot_20230805-081536_WhatsApp.jpg

दहिवडी पोलिसांनी लावला दारूच्या अड्याला सुरुंग..! सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या टीमची सर्वात मोठी कारवाई..!

सातारा (अंकुश पवार,सातारा जिल्हा प्रतिनिधी तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष,दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोजे मलवडी गावची हद्दीत माणगंगा नदीपात्रात मलवडी येथे हा दारूचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती दहिवडी पोलिस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अक्षय सोनावणे व टीम यांना मिळताच तत्काळ कारवाई करत संबंधित स्थळाला भेट देत आरोपी व मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
एकुण 51000 रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये अंदाजे 1000 किमतीचे आंबट व गुळचट उग्र वासाची गावठी दारू असलेले प्रत्येकी पाच लिटर क्षमतेचे 02 प्लास्टिक कॅन, अंदाजे 50,000 किमतीची एक जुनी वापरती हिरो होंडा स्प्लेंडर मो. सायकल असे आरोपी कडून जप्त करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यात असे स्वतःच्या फायद्यासाठी जर कोणी अवैध धंदे करून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या चुकीला माफी नाही हाच संदेश दहिवडी पोलिस स्टेशन अधिकारी यांनी जिल्यातील गुन्हेगारांना तसेच सामान्य जनतेचा पाठीशी खंबीर पने उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

Previous articleझोडग्यात लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहत साजरी
Next articleखोटे गुन्हे मागे घेऊन षडयंत्र रचणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.