
आशाताई बच्छाव
मुखेड येथील गुरु रविदास फुटवेअरला व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड येथील दिगंबर जमदाडे यांच्या सुप्रसिद्ध गुरु रविदास फुटवेअरला वीकेसी प्राईड इंडिया तर्फे दिला जाणारा सन 2022- 23 यावर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योजकता / मेगा रिवार्ड पुरस्कार केरळ येथील (कोची) येथे प्रदान करण्यात आला.
गुरु रविदास फुटवेअरला चाळीस वर्षाची परंपरा लाभली असून या फुटवेअरचे मालक दिगंबराव जमदाडे गोणारकर यांनी अगदी मेहनतीने छोटया रोपट्यापासुन वटवृक्षापर्यतचे संगोपन इथपर्यंतचा यशस्वी प्रवास ग्राहक व मित्र परिवाराच्या सहकार्यामूळेच दिसुन येते. त्यांनी ग्राहकांशी टिकवून ठेवलेले अतुट नाते, आत्मीयत्तेचे राहिलेले आहे. यातून त्यांनी सामाजिकता जोपासली आहे हे पहावयास मिळते. असंख्य ग्राहकांना अगदी विश्वासाने दिलेले योगदान आजपर्यंत त्यांच्या कार्यातुन त्यांनी विश्वास हीच परंपरा कायमp ठेवून यश संपादन केले आहे. तिमाही, सहामाही, वार्षिक खप कंपनीचे डेकोरेशन, सतत जाहीरात, सामाजिक योगदान लक्षात घेऊन पुरस्कारात राज्यातून दुसऱ्या क्रमांकाची निवड केली आहे. या फुटवेअरला आतापर्यंत यापूर्वी चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिगंबरराव जमदाडे यांच्या केलेल्या सततच्या प्रामाणिक मेहनतीला , जिद्दीला यश मिळत आहे अशी जनसामान्यात चर्चा व्यक्त होत आहे. व्हिकेसी प्राइड पुरस्कार हा व्हिकेसी प्राईड कंपनीचे MD व्हिकेसी रज्जाक, कौशलैंद्रसिंग, अमोल जैन (महा) जनरल मॅनेजर ,शहाबाद पटेल , इलियास पटेल परभणी , प्रफुल बलई कळंब , तसेच तौफीख पटेल लातुर यांच्या उपस्थितीत केरळ (कोची ) येथे व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय संमेलनात प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल गुरु रविदास फुटवेअर चे मालक दिगंबरराव जमदाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.