आशाताई बच्छाव
कुंदेवाडी विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात संपन्न
रामभाऊ आवारे निफाड
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी या शाखेत जागतिक ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शांताराम गायकवाड सर होते.याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षकांनी केले. ऑलम्पिक चळवळ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडाप्रेमी असलेले मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाचे क्रीडा प्रमुख विलास निरभवणे सरांचा ही या प्रसंगी सन्मान करण्यात आला. जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या थ्रो बॉल संघाचा तसेच इतर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यालयातील सर्व खेळाडूंचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. निरभवणे सरांनी विद्यार्थ्यांना उदबोधन करतांना ऑलिंपिक चा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडला.तर विद्यालयाच्या हिंदी विषय प्रमुख श्रीमती रंजना पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ऑलिंपिक खेळाचे महत्व, त्याचे जागतिक स्थान याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी रोज खेळ खेळलाच पाहिजे असा संदेश दिला. या दिनाचे औचित्य साधत ऑलिंपिक डे वॉक चे आयोजन करण्यात आले. विद्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्याध्यापकांसह, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले आणि सर्वांनी मोठ्या आनंद आणि उत्साहात हे अंतर पार केले. याप्रसंगी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.