
आशाताई बच्छाव
संग्रामपूर तहसीलला लाभले कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोम्पे.
युवा मराठा टीमने पुष्पगुच्छ देऊन अनेक विषयावर साधला वार्तालाभ!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज
संग्रामपूर तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री योगेश्वर टोम्पे यांची लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा मराठा न्यूज चे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी घेतली तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांची ग्रेट भेट तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांची शुभेच्छा भेट घेण्याकरिता फौजदारी ज्येष्ठविधीज्ञ विद्यासागर आलोने, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख, सदस्य नंदू पाटील खानझोड, (शिंदे गट) शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल पाटील मारोडे, उमेश पाटील शेळके, तसेच युवा मराठा न्यूज चे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी संग्रामपूर तहसीलला नवीने रुजू झालेले तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असून भेटी दरम्यान विद्यमान तहसीलदार यांच्यासोबत झालेल्या वार्ता लाभामध्ये त्यांच्यासोबत झालेली भेट ही एक ग्रेट भेट असल्याची अनुभूती उपस्थित सर्वांनाच आली अतिशय साधे सरळ व मनमोकळ्या स्वभावाचे असलेले तहसीलदार योगेश्वर टोम्पे हे कर्तव्यदक्ष असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून अनुभूती आली. भेटी दरम्यान झालेल्या वार्ता लाभात त्यांनी सांगितले की यापूर्वी या कार्यालयात जे झाले ते झाले यानंतर हे कार्यालय जनतेसाठी सदैव खुले असून जनतेने ज्यांची ज्यांची कामे पेंटिंग असतील त्यांना कुठल्याही मध्यस्थी किंवा शिफारशीची गरज नसून त्यांनी माझ्याशी थेट संपर्क केला तरी माझे कार्यालयाची दरवाजे सर्वसामान्यांसाठी पूर्णता उघडे असतील तसेच तालुक्यातील नागरिकांना अति महत्त्वाची अडचण असल्यास त्यांनी माझ्या भ्रमणध्वनीवर सुद्धा माहिती दिल्यास मी तात्काळ नियमानुसार समस्येचे निवारण करण्याचे प्रयत्न करेल तसेच त्यांनी आश्वासन देखील दिले की सर्वसामान्य जनतेला अडचण येत असेल तर यानंतर कॅम्पचे आयोजन करून सर्वसामान्यांच्या समस्या सोडण्याचे काम लवकरच सर्वांच्या सहकार्याने उपक्रम सुद्धा घेता येतील यामुळे आता संग्रामपूर तालुक्यातील महसूल विभागात सकारात्मक बदल घडून येतील असे वाटत आहे.
याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री डी वाय चंद्रचूड यांची झाली आठवण कारण तहसीलदार साहेबांसोबत संवाद साधतेवेळी त्यांनी सांगितले की मला काही लोकांकडून माहिती मिळाली की बरेच लोक भेटीला आल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग घेतात किंवा कॅमेरा पेन द्वारे स्टिंग ऑपरेशन करतात. मात्र जर मी योग्य वागत असेल माझ्या बोलण्यात कुठलाही अवास्तवपना नसेल मी जर ससोटीने व सौजन्याने बोलत असेल तर मला कोणी शूटिंग किंवा स्टिंग ऑपरेशन केल्यास घाबरण्याची कुठली भीती वाटत नाही. कारण मी माझ्या कार्यालयीन वागणूकीत नम्र व कर्तव्यदक्ष आहे व सर्व सामान्यांचे कामे करणे हेच माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे कोणीही माझे स्टिंग ऑपरेशन केले किंवा शूटिंग काढली तर काढू द्या आपण चांगले तर जग चांगल हे शब्द माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी त्यांच्या कोर्टात होत असल्यास सुनावणी बाबत शूटिंग काढणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलले होते त्यामुळे आताचे तहसीलदार हे मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवते.