Home सातारा केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या परीक्षांचा निकाल महाराष्ट्रासाठी उत्साहवर्धक आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या परीक्षांचा निकाल महाराष्ट्रासाठी उत्साहवर्धक आहे.

269

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0005.jpg

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषित केलेल्या परीक्षांचा निकाल महाराष्ट्रासाठी उत्साहवर्धक आहे.

महाराष्ट्रातील अनेक तरूण – तरूणींनी यामध्ये स्थान पटकावले आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल बिरो चीफ महादेव घोलप.

सातारा
दहिवडी, तालुका-माण येथील मा.ॲड.संदेश गुंडगे यांचे बंधु मा.श्री.ओंकार गुंडगे यांनी युपीएससी परिक्षेत दैदिप्यमान कामगिरी करत ३८० रॅंकने उत्तीर्ण झाले व माण तालुक्यातील पहिला आयएएस/आयपीएस या श्रेणीतील अधिकारी होण्याचा मान मिळवला.

गुंडगे परिवार गेल्या ४-५ दशकापासून केवळ माण तालुकाच नव्हे तर संपुर्ण सातारा जिल्ह्यात सामाजिक,राजकीय व सहकार क्षेत्रात कार्यरत असुन मा.ॲड.भास्करराव गुंडगे यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. आजही हा परिवार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत आहे. अशा सामाजिक बांधिलकी असलेल्या परिवारातील तरूण स्पर्धा परिक्षेत यश मिळवून भारतीय प्रशासन सेवेत दाखल होत आहे याचा मला विशेष आनंद वाटतो.