आशाताई बच्छाव
अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…! मालेगांव,(प्रतिनिधी विजय चांदणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा अमित राजसाहेब ठाकरे यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त हर्षल गवळी मित्र परिवाराने शहरातील व ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना वाढदिवसा निमित्ताने अनोखी भेट दिली.
१ लिटर पेट्रोल मागे ३१ रु सूट दिली हा उपक्रम मालेगांव शहरात प्रथमच झाला असुन विध्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी अमित साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनसे विद्यार्थी सेनेचे हर्षल गवळी यांचे आभार मानले. व हर्षल गवळी मित्र परिवाराने विद्यार्थ्यांना सवलती चे पास वाटून कार्यक्रम यशस्वी केला आणि पेट्रोल पंप चे संचालक व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्या प्रसंगी उपस्थित मनसे विद्यार्थी सेनेचे श्री हर्षल गवळी, मोहन कांबळे, ऋषी गवळी,किशोर गडरी, निशांत जाधव, खुशाल लोंढे व मित्र परिवार होते…