
आशाताई बच्छाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत आज कार्यशाळा
शत्रुघ्न काकडे पाटील -:जिल्हा प्रतिनिधी
परभणी :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत जिल्ह्यातील महाविद्यालय, विद्यार्थी व संबंधीत योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेबद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती व्हावी, यासाठी त्यांची मंगळवार, दि. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून औरंगाबाद समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या सूचनेनुसार शासकीय वसतिगृहात पात्र असूनही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी दिनांक १३ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.